स्पोर्ट्स

33 व्या सीनियर महाराष्ट्र राज्य सेपक टाकरॉ स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ नागपूर येथे रवाना

 

दिनांक 17 ते 19 मार्च 2023 या कालावधीत महाराष्ट्र सेपक टाकरॉ असोसिएशन, व नागपूर जिल्हा सेपक टाकरॉ असोिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 33 व्या सीनियर महाराष्ट्र राज्य सेपक टाकरॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ सहभागी होण्यासाठी दिनांक 16 मार्च 2023 रोजी नांदेड येथून रवाना झाला.
 नांदेड जिल्ह्याचा संघ पुढील प्रमाणे
पुरुष : आनंद संतोष पंडित (कर्णधार), आसंग सुधीर जोंधळे,निशांत अशोकराव कदम,सुदेश उत्तम कांबळे,प्रतीक गंगाधर सोनटक्के,श्रीराम मारोती कदम,सचिन उत्तम कांबळे,वेदांत विश्वनाथ दासे,वेदांत तुकाराम सुर्यवंशी,दिलीप विश्वनाथ हनुमंते,दिलीप माधवराव सुर्यवंशी तर महिला संघ: श्रद्धा सूर्जसिंह अवस्थी(कर्णधार),प्रशंसा प्रकाश वाडीकर,साक्षी अनिल गच्चे, श्रावणी रमेश पवार,तेजस्विनी गजानन काळे,अनुष्का संभाजी सरपाते,कोमल सुरेश दवरे, श्रुती बालाजी बंगरवार, धनश्री दिगांबर कांबळे आदी खेळाडू नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत तर संघाचे प्रशिक्षक म्हणून रविकुमार हरिदास बकवाड व संघ व्यवस्थापक म्हणून विशाल रमा कांबळे हे संघासोबत काम पाहतील या स्पर्धेसाठी वरील खेळाडूंना जिल्हा क्रीडधिकारी राजेश्वर मारावार, लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूलचे अध्यक्ष रवींद्र रेड्डी सर नांदेड जिल्हा सेपक टाकरॉ असोिएशन सचिव प्रवीणकुमार कुपटीकर सर, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर,क्रीडा मार्गदर्शक सुनंदा देशमुख मॅडम,आदीने शुभेच्छा दिल्या वरील खेळाडूंना प्रशिक्षक रविकुमार बकवाड यांचे मार्गदर्शन लाभले .

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button