कृषी
रेशीमची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर बाबुराव राजेगोरे
अर्धापूर ( शेख जुबेर )
शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला जोड धंदा म्हणून रेशीम शेतीची उभारणी केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळते. मागील दोन वर्षापासून मी ही शेती करतो कॉटेज इंडस्ट्रीजमध्ये रेशीम शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे यातून लाखो लोकांना रोजगार मिळतो असे प्रतिपादन मौजे शेलगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबुराव राजेगोरे यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या सिरी कल्चर सेंटरला महाविद्यालयातील विद्यार्थीनी भेट दिली असता त्यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये प्राणीशास्त्र विभागाची शैक्षणिक सहल मौजे शेलगाव येथे आयोजित करून त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या रेशमीची शेती विषय विद्यार्थ्यांना माहिती दिली. या सहलीला संबोधित करताना शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.के.ए.नजम यांनी रेशमीचे ऊत्पन्न काढण्यासंदर्भात तांत्रिक माहीती दिली. या सहलीमध्ये शेलगावचे माजी सरपंच सुभाषराव राजेगोरे, प्रा.राम राजगोरे, प्रा.सौ.रत्नमाला म्हस्के, प्रा.सुमन पुपलवाड, बालाजी पंदिलवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम राजेगोरे यांनी केले तर आभार प्रा.सुमन पुपलवाड, यांनी मानले. या शैक्षणिक सहलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.