जिला
समाज महिलाविषयी संवेदनशील असला पाहिजे….डॉ.प्रतिमा बंडेवार
अर्धापूर ( शेख जुबेर )
आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लिंग-भेद केला जातो व स्त्री भ्रूणहत्या केली जाते ही शोकांतिका आहे. मुलींना प्रत्येक क्षेत्रामध्ये दुय्यम स्थान दिले जाते. आजच्या मुलीही आई- वडिलांचा आर्थिक व भावनिक सांभाळ करतात. कायदे जरी असले तरी त्याची अंमलबजावणी वेगळीच असते. राजकीय क्षेत्रामध्ये कागदावर पदाधिकारी जरी असल्या तरी कारभारी पुरुषच असतो. कुटुंबाच्या संवर्धनात महिला स्वतःच्या आरोग्यकडे दुर्लक्ष करतात. या सर्व पार्श्वभूमीवर महिलांबाबत संवेदनशील असला पाहिजे असे प्रतिपादन नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ.प्रतिमा बंडेवार यांनी केले ते शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूरच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महिला सबलीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.पाटील हे होते.
तर व्यासपीठावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.स्वाती मदनवाड, डॉ.सारिका औरादकर, डॉ. रत्नमाला म्हस्के, प्रा.मनिषा पवार प्रा.राजश्री भोपळे, डाॅ. मंजुषा भटकर, प्रा.विजयालक्ष्मी भद्रशेटे, प्रा.सुमन पुपलवाड, प्रा.वैशाली लोणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निबंध स्पर्धेत प्रथम कु.मानसी इंदेवाड, द्वितीय कु.निकिता राजेगोरे, व तृतीय क्रमांक कु.अंकिता गवारे व कु.अस्मिता राऊत तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय विशेष शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या कु.अंकिता क्षीरसागर, कु.सानिका गावंडे, कु.अंकिता मोरे, कु.शिवानी खरे या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.के.के.पाटील म्हणाले की, जागतिक स्तरावर प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आपले कर्तव्य बजावत आहेत. महिलांना संधी मिळाल्यास त्या संधीचं ते सोनं करतात फक्त पुरुष मानसिकतेतून बाहेर पडून त्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका व महिला कक्षाच्या समन्वयक प्रा.स्वाती मदनवाड म्हणाल्या की महाविद्यालयात विद्यार्थिनीची संख्या लक्षणीय आहे.
महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडी घेत आहे असे त्या म्हणाल्या. प्रमुख वक्त्यांचा परिचय ग्रंथपाल डाॅ.मधुकर बोरसे यांनी करून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मनीषा पवार यांनी केले तर आभार डाॅ.शेटे आर.बी यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते