क्राईम

पूर्व वैमनस्यातून युवकाचा भोसकून खून

 

नांदेड दि. 6 ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाजेगाव परिसरामध्ये पाळत ठेवून एका वीस वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला मारेकऱ्यापैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
सय्यद अतीक सय्यद हुसेन हा युवक वाजेगाव मटन मार्केट परिसरात फिरत असताना शेख अमीन उर्फ दद्दू ,मोहसीन पठाण समशेर पठाण व शेख अमीर शेख अहमद सर्व राहणार वाजेगाव यांनी दुचाकी क्रमांक एम हेच 26 सी झिरो 0316 वर येऊन एक आर्थिक वर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली सदरील घटनाही 5 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार,पोलीस उपाधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे, नांदेड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व एका आरोपीस ताब्यात घेतले मयताचा भाऊ सय्यद गौस सय्यद हुसेन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button