क्राईम

घरगुती वापराचा गॅस वाहनात भरताना इतवारा पोलिसांची कारवाई 

नांदेड दि.६ घरगुती स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा गॅस हा अवैध मार्गाने वाहनांमध्ये भरून गैरप्रकार करत असताना इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, सहकारी पोलीस निरीक्षक गणेश गोटके,रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार दासरवाड, माने, मिलिंद नरबाग, धीरज कोमुलवार, वाय.के. कासार यांच्यासह धाड टाकून 28 अवैद्य गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले देगलूर नाका परिसरातील टायर बोर्ड उमर कॉलनी येथील एका दुकानात सदरील अवैध प्रकार चालत असल्याची खबर मिळाल्या नंतर ही कारवाही करण्यात. अवैद्यपणे वाहनात गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आणि अब्दुल रहीम जुम्मा खान या युवकास अटक करून त्याच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत चालू होती

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button