जिला
जुनी पेंन्शन योजना लागू करावी अन्यथा 14 मार्च पासून मराठवाड्यातील शिक्षक बेमुदत संपावर जाणार ..मराठवाडा शिक्षक संघ.
नांदेड दिनांक 2 मार्च: अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेंन्शन योजना लागू करावी अन्यथा राज्य सरकारी निमसरकारी कर्मचा-यांबरोबर मराठवाड्यातील शिक्षक बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार आणि जिल्हा सचिव रविद्र वाकोडे यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की, जुनी पेंन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायत कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी 14 मार्च पासून बेमुदत संपाची नोटीस दिली आहे. या सर्व कर्मचा-यांबरोबर महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शिक्षकांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. मराठवाडा शिक्षक संघाने आज जिल्हाधिकारी महोदयां मार्फत निवेदन पाठवण्यात आले. अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेंन्शन योजना लागू करावी या मागणीसह समन्वय समितीच्या मागणी पत्रातील सर्व मागण्यां आणि मराठवाडा शिक्षक संघाच्या मागणी पत्रातील सर्व मागण्यां मान्य कराव्यात अन्यथा मराठवाड्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 14 मार्च पासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय सहचिव सौ.रेखा सोळूंके जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार, जिल्हा सचिव रविद्र वाकोडे ,शहराध्यक्ष डी.बी.नाईक ,शहरसचिव बी.एस टिमकीकर,महिला अध्यक्ष सौ.विजयालक्ष्मी स्वामी,कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील ,उपाध्यक्ष क्लेमेंट अल्लाडा,शे.हसिब,सहचिव आर.पी.वाघमारे ,शहर कार्याध्यक्ष राजेश कदम,ता.सचिव घाटे बी.जी.,संघटक विनोद गोस्वामी यांच्या स्वाक्ष-या असून आपल्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी संप यशस्वी करावा असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष-सुर्यकांत विश्वासराव ,सचिव राजकूमार कदम, केंद्र कार्यकारिणी सदस्य जी.पी.कौसल्ये ,ई.डी.पाटोदेकर , उत्तम लाठकर ,डाॕ .विठ्ठल भंडारे ,विजय खुनिवाड ,गणेश बडुरे ,आनंद मोरे,एम.एस.मठपती ,माणिक हळदे,संजय रेकूलवार,रायकोड नागोराव ,प्रा.कर्णे आनंद ,शिवानंद स्वामी,रमेश सज्जन ,वडवळे एच.बी.यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील सर्व पदाधिका-यांनी आवाहन केले आहे.