मराठवाडा

पवित्र रमजान महिन्यापूर्वी मदिना नगरातील सर्व नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती करा

परभणी : (परभणी जिल्हा प्रतिनिधी) परभणी येथील वार्ड क्रमांक दोन मधील मदिना नगर परिसरातील ओपन स्पेस मध्ये महावितरण कंपनीच्या विद्युत पुरवठेची सरहद्द गांधी डिपी क्रमांक एक ते तीन व मदिना डिपो अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाल्याने डिपी सतत उघड्यावर असल्याने महावितरणचा कारभार रामभरोसे सुरू आहे या नादुरुस्त डिपी मुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने या परिसरातील ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा  लागत आहे यामुळे ग्राहकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे या संदर्भात वारंवार लेखी तोंडी तक्रार केली परंतु महावितरण कंपनीचे झोन क्रमांक चार चे संबंधित कनिष्ठ अभियंता व कर्मचारी याकडे हलगर्जीपणा करत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
आता पुढील काही दिवसांपासून मुस्लिम धर्मातील पवित्र रमजान महिना सुरू होणार आहे यापूर्वी महावितरण कंपनीकडून या परिसरातील सर्व नादुरुस्त डिपोची पाहाणी करून दुरुस्तीसाठी उपयोजना करावी डिपो उघड्यावर डिपो असल्याने यातून एखाद्या ठिकाणी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही मदिना नगर परिसरात सर्व रोहित्र, डिपोंचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करावा,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद रफिक पेडगावकर यांनी केली याकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने अधीक्षक अभियंता महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा छेडण्याचा इशारा दिला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button