मिळालेल्या गुप्त माहितीवरून डीवायएसपी आमना यांनी हिमायतनगरात ४० लाखांचा गुटखा पकडला; स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
हिमायतनगर| राज्य शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची हिमायतनगर शहरात खुलेआम विक्री होत असून, याचं ठिकाणाहून विदर्भात होलसेल माल पाठविला जातो आहे. असे असताना स्थानिक पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांनी रविवारी मध्यरात्रीला छापा टाकून तब्बल ४० लाखाहून अधिकचा गुटखा जप्त केला आहे. त्यामुळे गुटखा माफ़ियाची झोप उडाली असून, उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाही नंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
राज्य सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी आणली असली तरी त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिसांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होते आहे. हिमायतनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तीन ते चार व्यापाऱ्याकडून गुटख्याची विक्री राजरोसपणे केली जात आहे. असे असताना देखील स्थानिक पोलिसांनी या वर्षात एकही कार्यवाही का..? केली नाही असा सवाल असता व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या युवा पिढीच्या पालकातून विचारला जातो आहे. हिमायतनगर शहरात गुटख्यासह, मटका, जुगार व इतर अवैद्य धंदे करणारे जवळपास सर्वच राजकीय वरद हस्त असलेल्या व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांचे पोलिसांसोबत साटेलोटे स्थापित होऊन संगनमत सर्व अवैद्य धंदे चालविले जात असल्याचे शहरातील जनतेतून बोलल्या जाते आहे.
गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या मॅग्नेशियम कार्बोनेटसारख्या घातक घटकांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. तंबाखुजन्य पदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू नये, यासाठी राज्य सरकारने २०१२ पासून गुटख्याची निर्मिती आणि विक्रीवर कायदेशीर बंदी घातली आहे. या निर्णयाला १० वर्षे उलटली. मात्र कायद्यातील पळवाटा आणि काही स्वार्थी पोलीस अधिकारी – कर्मचारी यांच्या छुप्या युतीमुळे गुटखा व पानमसाल्याची राजरोस विक्री सुरूच आहे. कर्नाटकातून राज्यातून महाराष्ट्रातील मुख्यत्वे हिमायतनगर शहरात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गुटखा कंटेनरसह पोचतो. याचे अनेक उदाहरणे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी मागील काळात हिमायतनगरात छापे टाकून केलेल्या कायावाहीवरुन सिद्ध होते आहे.
हिमायतनगर शहरातील जवळपास ४ बड्या व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात कंटेनरमधून परराज्यातून गुटखा आनला जातो. हिमायतनगर शहरात हा माल उतरून विदर्भासह अनेक ठिकाणच्या बाजारपेठेत सोयीस्कररीत्या पोचविल्या जातो. यामध्ये विविध प्रकारच्या ब्रॅंडच्या पान मसाला आणि गुटख्याची अवाक व विक्री होत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. याबाबत विविध संघटनांनी कार्यवाहीची मागणी केली. मात्र डोळ्यावर पट्टी बांधलेल्या स्थानिक पोलिसांना हा प्रकार का..? दिसत नसेल याबाबत साशंकता निर्माण होते आहे.
त्यामुळेच कि काय..? भोकरच्या उपविभागीय अधिकारी शफकत आमना यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मध्यरात्रीच्या पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बागवान गल्लीत दोन ठिकाणी छापा टाकून जवळपास ६० हुन अधिक गुटख्याच्या पोती जप्त केली आहेत. हा सर्व साठा हिमायतनगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला असून, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आल्यानंतर मोजमाप होऊन संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिमायतनगर येथे अवैध्य गुटख्याच्या ठिकाणावर छापा टाकून कार्यवाही केल्याने सर्व स्तरातू अभिनंदन केले जात आहे. तसेच शहरातील इतरही गुटखा माफियासह, जुगार, मटका, यासह अन्य अवैद्य धंद्यावरही अश्याच प्रकारची कार्यवाही करावी अशी मागणी सुजाण नागरीकातून व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीच आमना यांनी दिली होती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना सूचना
उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांनी भोकर येथे उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्याला भेट दिली होती. त्यावेळी येथील अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन माझ्या कार्यकाळात अवैद्य धंदे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सूट मिळणार नाही. आपल्या स्तरावर कार्यवाही व्हावी… माझ्यापर्यंत गुप्त माहिती येण्यापूर्वी हिमायतनगर शहरात चालणारे सर्व अवैद्य धंदे बंद झाले पाहिजे अश्या सक्त सूचना दिल्या होत्या. मात्र काही दिवस त्यांच्या सूचनांचे पालन स्थानिक पोलिसांनी करून पुन्हा छुप्या पद्धतीने शहरात सर्वच अवैद्य धंद्यांना मोकळी दिली आहे. त्यामुळे शहर व तालुका परिसरातील प्रमुख गावात गुटखा, मटका, जुगार, अवैद्य दारू व हातभट्टीची विक्री व वाहतूक, तसेच इतर धंदे राजरोसपणे चालविले जात आहे. त्यामुळे भांडण तंटे निर्माण होऊन गावातील शांतता बिघडत चालली आहे. यासाठी विविध गावातील नागरिक दारूबंदीसाठी एल्गार पुकारत पोलीस ठाणे गाठून निवेदन देत असले तरी पुन्हा त्या गावात जोमाने सर्वच धंदे चालत असल्याचे चित्र असल्याचे नागरिक सांगत आहेत. हिमायतनगर शहर व तालुक्यात सुरु असलेल्या या प्रकारावर अंकुश आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना ह्या कश्या..? पद्धतीने प्रयत्न करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.