क्राईम

लग्नाच्या रिसेप्शनदिवशी पत्नीची धारदार शस्त्राने हत्या, पतीचाही मृत्यू दोन दिवसापुर्वी धुमधडाक्यात केला होता प्रेमविवाह

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दोन दिवसांपुर्वीच प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याचे मृतदेह मंगळवारी रात्री आढळून आले. दोघांचेही मृतदेह घरातील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात सापडले. नववधूच्या छातीवर वार केले असून वराच्या मानेवरही मोठी जखम आहे.

दोघांमध्ये पूर्वी झालेल्या वादातून आधी पतीने पत्नीवर हल्ला केला, त्यानंतर मुलीनेही त्याच्यावर हल्ला केला असावा आणि दोघांचा मृत्यू झाला असावा, असे मानले जात आहे. पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

हे प्रकरण रायपूरच्या संतोषी नगर भागाला लागून असलेल्या ब्रिज नगरचे आहे. येथे राहणारा 24 वर्षीय अस्लमचा विवाह राजातालाब परिसरात राहणाऱ्या कहक्शान बानोसोबत 19 फेब्रुवारीला झाला होता. ब्रिज नगर येथील अस्लमच्या घरातून दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत.

रायपूर शहरातील शास्त्री बाजार येथील सीरत मैदानात या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीची जय्यत तयारी करण्यात आली होती. पाहुण्यांसाठी मंडप सजला होता. आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र मेजवानीच्या आधीच या कुटुंबावर हे संकट कोसळले आणि आनंदी वातावरणाचे रूपांतर क्षणात दु:खात झाले.

पोलिस अधिकारी राजेश चौधरी यांच्या माहितीनुसार, दोघांनी खोलीला आतून कुलूप लावले होते. खोलीत फक्त अस्लम आणि काहक्शान उपस्थित होते. दोघेही रिसेप्शनच्या तयारीत होते. तेवढ्यात किंचाळण्याचा आवाज आला. घरी उपस्थित असलमच्या आईने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

मात्र दरवाजा आतून बंद असल्याने ती उघडू शकली नाही. यानंतर नवीन सुनेचा आरडाओरडा ऐकून आईने खिडकीतून डोकावले असता मुलगा खाली पडलेला आणि सुनेचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला. संपूर्ण खोली रक्ताने माखलेली होती.

प्राथमिक तपासात घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर एकमेकांवर हल्ला करण्याची परिस्थिती निर्माण झाली असावी, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या पोलिसांनी अस्लमचे घर सील केले आहे.

दोघांचेही मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. असलम हा मेकॅनिक म्हणून काम करत असे. तर काहक्शानचे वडील ड्रायव्हर आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button