राजकुमार लिंगदळे यांना पीएचडी प्रदान
नांदेड दि.28 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मानव विद्या शाखेंतर्गत “शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी व फलश्रुती : नांदेड जिल्ह्याचा विशेष अभ्यास” या शीर्षकांतर्गत लोकप्रशासन विषयात राजकुमार लिंगदळे यांना डॉ.बि.सी.वडवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली यावेळी आयोजित मौखिक परीक्षेसाठी परिक्षा बहिस्थ परीक्षक म्हणून औरंगाबाद येथील राजर्षी शाहु महाविद्यालयाचे डॉ.संजय कांबळे सर उपस्थित होते.तसेच सहयोगी अधिष्ठाता डाॅ.विकास सुकाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली पीएचडी मौखिक परीक्षा यशस्वीपणे पुर्ण झाली. या यशा बद्दल राजकुमार लिंगदळे व डॉ.बी.सी.वडवळे यांचे डॉ. विजय तरोडे,डॉ. सुरेश गजभारे,प्रा.अनंत कौसडीकर प्रा.अशोक आळणे,प्रा.बाबासाहेब भुकतरे,डॉ. जे.यू.हाटकर, शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिर्गे,अनिल केंद्रे,चंद्रकांत मेकाले,उपशिक्षणाधिकारी बंडू अंमदुरकर यांनी अभिनंदन केले आहे.