ठाकरे गटाला दिलासा; पक्ष, चिन्हाविरोधात सुप्रीम
सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाबाबत तातडीचा उल्लेख केला आहे.
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटाच्या आमदारांनी ताब्यात घेतले आहे. तसंच, शिवालयाचा ही शिंदे गट ताबा घेणार आहे. शिवसेना शिंदे गटातील आमदार शिवालयात जाणार आहे. विधिमंडळातील बैठक झाल्यावर ताबा घेणार आहे.
शिवालय हे पक्षाचे शासकीय कार्यालय आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर हे कार्यालय देखील आमचे असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे.
तसंच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी ठरवण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. नवी राष्ट्रीय कार्यकारिणीही लवकरच जाहीर केली जाणार आहे. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी मुंबईत होणार आहे. या कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांची प्रमुखपदी निवड केली जाणार आहे.