क्राईम
उस्माननगर हद्दीमध्ये जबरी चोरी करणारे तिन आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व उस्माननगर पोलीसांची संयुक्त कार्यवाही
दिनांक 03/08/2022 रोजी सकाळी 11.30 वाजताचे सुमारास मारताळा ते कापसी जाणारे रोडवर कापसी शिवारात फिर्यादी नामे गोपाळ गंगाधर मुरसेटवार हे सोमान फायनान्स सर्व्हिस प्रा. लिमीटेड नांदेड यांची वसुली करुन जात असताना, दोन मोटार सायकलवर आलेल्या चार चोरटयांनी त्यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांचेजवळील 30730/- रुपयाची बॅग बळजबरीने हिसकावुन नेली होती. सदर प्रकरणी पोलीस ठाणे उस्माननगर येथे गुरनं. 141/2022 कलम 392,34 भा. दं. वि. प्रमाणे गुन्हा दाखल होवुन सदर गुन्हयाचा तपास सुरु होता.
सदर गुन्हयांचे अनुषंगाने आज दिनांक 14/02/2023 रोजी श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा धोडींवा ऊर्फ बबलु विठल टोम्पे रा. पांगरी ता. जि. नांदेड याने व त्याचे साथीदारांनी मिळुन केला आहे. सदर माहीतीवरुन आरोपी नामे धोडींबा ऊर्फ बबलु विठल टोम्पे रा. पांगरी ता. जि. नांदेड यास पकडुन विचारपुस केली असता, त्याने त्याच्या इतर चार साथीदारासोबत मिळुन सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगीतले असुन इतर साथीदारापैकी आरोपी नामे 1) नोमानखान इब्राहिमखान रा उमरकॉलनी नांदेड 2) गौतम माधव कांबळे रा कापशी ता लोहा जि. नांदेड यांना पकडले असुन सदर तिनही आरोपीतांना पुढील कायदेशिर कार्यवाहीकामी पोलीस ठाणे उस्माननगर यांचे ताब्यात दिले आहे. सदर आरोपी कडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, मा. श्री मारोती थोरात, उप विभागीय पोलीस अधिकारी, कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड, सपोनि / पांडुरंग भारती, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि / जसवंतसिंघ शाहु, प्रभु केंद्रे, पो कॉ / तानाजी येळगे, पो कॉ / मोतीराम पवार, शेख जावेद, व्यंकट गांगुलवार, चापोकों/गंगाधर घुगे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.