“मुली शिक्षणासाठी शहरात जातात अन् भाड्याच्या खोलीत मुलांबरोबर…”, ‘लिव्ह इन रिलेशन’वरून नवनीत राणांचं वादग्रस्त वक्तव्य
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ‘लिव्ह इन रिलेशन’बाबत मोठं विधान केलं आहे. मी माझ्या संपूर्ण जीवनात कधीही’लिव्ह इन रिलेशन’बाबत ऐकलं नव्हतं. पण आजच्या पिढीकडून हे सगळं ऐकतं आहे. आई-वडील मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात. पण तिथे मुली भाड्याच्या घरात मुलांसोबत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहतात, अशा आशयाचं विधान नवनीत राणा यांनी केलं. त्या अमरावती येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या.
उपस्थित लोकांना संबोधित करताना नवनीत राणा म्हणाल्या, “मीही याच पिढीची आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ काय असतं? हे मी माझ्या जीवनात कधीही ऐकलं नाही. पण आजच्या पिढीकडून ऐकते की मुलं-मुली लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात. आई-वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात. तिथे मुली भाड्याच्या घरात मुलांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मुलं-मुलांबरोबर लग्न करतात आणि मुली मुलींबरोबर लग्न करत आहेत. ही कुठली परंपरा आपल्या जीवनात आली?”
आई वडील हे आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात, तिथे त्या भाड्याच्या खोलीत मुलांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात’, असे वादग्रस्त विधान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं.
अमरावती येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यावरून आता वादाला तोंड फुटणार आहे.
‘मी देखील याच पिढीतली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल मला काहीच माहित नव्हतं. मी माझ्या जीवनात त्याबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. हल्ली मी ऐकतेय मुलं मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. आई वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात. तिथे मुली मुलांसोबत भाड्याच्या घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मुलं-मुलांबरोबर लग्न करतात आणि मुली मुलींबरोबर लग्न करत आहेत. ही कुठली परंपरा आपल्या जीवनात आली?’ असे नवनीत राणा म्हणाल्या.
‘ मी हे सर्व इंस्टाग्राम सोशल मीडियावर पाहत असते. त्याचं फार वाईट वाटतं. ते दुख माझ्या मनात कुठे ना कुठेतरी आहे. आपल्या तरुण पिढीत ही गोष्ट कुठून आली नेमकी? आपल्याला स्वावलंबी करायला आपल्या आई वडिलांनी रक्ताचं पाणी केलं. म्हणून आपण स्वावलंबी झालो, एका पदापर्यंत पोहोचलो. त्यानंतर कमवायला काय लागलो म्हणून असं वागायचं? ही आपली संस्कृती नाही’ असे नवनीत राणा म्हणाल्या.