क्राईम

दरोडा टाकणाऱ्या राजस्थानी टोळीस रंगेहाथ पकडले

दिनांक 10.02.2023 रोजी सकाळी 10.45 वा. सुमारास पोलीस ठाणे भाग्यनगर येथे डाईल 112 वर वेदांतनगर, मालेगाव रोड नांदेड येथुन कॉल आला की, सकाळी 10.30 वा. सुमारासस एका महिलेच्या घरामध्ये तीन चोरटयांनी प्रवेश करून जिवे मारण्याची धमकी देवून चाकुचा धाक दाखविला व अंगावर असलेले सोन्याचे मंगळसुत्र पेंडालसह जबरीने चोरून घेवून गेले आहेत. वगैरे माहितीवरून कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार पोहेकॉ / शिवराज गोणारकर, पोना / बोरकर यांनी तात्काळ प्रतीसाद देवून घटनास्थळी धाव घेवून आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली.
सदर भागामध्ये मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. डॉ. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, मा. श्री सिध्देश्वर मोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे पोलीस ठाणे विमानतळ येथील गोळीबार घटनेतील आरोपीचे शोधार्थ असलेले सपोनि / चंद्रकांत पवार, पोहेकॉ / वाणी, पोकों / मुंजाजी चवरे, खंडागळे पोलीस स्टेशन लिंबगाव तसेच पोउपनि / गोटके, पोकों / हाके, पोस्टे ईतवारा, तसेच पोहेकॉ / दत्तराम जाधव, पोकों / शरदचंद्र चावरे, मनोज परदेशी, रमेश सुर्यवंशी, बालाजी कदम, पोस्टे वजिराबाद यांनी सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी सदर भागामध्ये आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. आरोपीचा शोध घेत असताना तीन ईसम संशईतरित्या मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये सोन्याचे मंगळसुत्र पेंडालसह व धारदार चाकु असे मिळुन आले.
त्यांना त्याबाबत विचारणा करता त्यांनी वेदांतनगर भागामध्ये चोरी केली असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अधिक विचारणा करता सदर चोरी करताना आजुबाजुस वॉच करणारे त्यांचे ईतर दोन साथीदार यांचेबाबत माहिती दिली. त्यावरून त्यांना सुध्दा ताब्यात घेण्यात आले 1. प्रदिप शंकरलाल स्वामी वय 19 वर्षे व्यवसाय फरसीचे काम, 2. पवनकुमार पि. रामुराम जाठ वय 24 वर्षे व्यवसाय फरसीकाम, 3. राजेंद्रकुमार सुरेशकुमार जाठ वय 24 वर्षे व्यवसाय फरसीकाम 4. पंकजशंकरलाल स्वामी वय 21 वर्षे व्यवसाय फरसीकाम 5. मनिष नेमीचंद सेन वय 21 वर्षे व्यवसाय फरसीकाम सर्व रा. नौसल तहसील दाताराम गड जि. सिकर, राजस्थान यांचे कडुन सदर गुहयातील चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसुत्र पेंडालसह किंमती 80,000/- रूपयाचे व गुन्हयात वापरलेले हत्यार चाकु हस्तगत करण्यात आला आहे. सदर प्रकरणात दरोडा सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास पोनि / अशोक अनंत्रे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / विजयकुमार कांबळे हे करीत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button