Uncategorized
मोक्का गुन्हयातील आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई
दिनांक 01/10/2022 रोजी 14.00 ते 14.20 वाजण्याचे सुमारास मौजे सिंधी येथे व्हीपीके साखर कारखान्याचे समोर कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था, सिंधी ता. उमरी येथे आरोपीतांनी दरोडा घातलेल्या प्रकरणी पो.स्टे. उमरी जि. नांदेड येथे गु.र.नं. 240/2022 कलम 395 भा.दं.वि. सहकलम 4/25 शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणी मोक्का कायदयान्वये कारवाई करुन तपास करुन तपासांती गुन्हया मा. न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात पाहीजे असलेला आरोपी शेख सोहेल शेख रज्जाक रा. तेहरानगर, शिवाजीनगर, नांदेड हा फरार होता.
आज दिनांक 10/02/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि पांडुरंग माने हे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार हे वर नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नांदेड, पो. नि. स्थागुशा यांचे आदेशान्वये नांदेड शहरात रवाना झाले होते.
सदर पथकास गोपनिय माहिती मिळाली की सदर आरोपी नामे शेख सोहेल शेख रज्जाक रा. तेहरानगर, शिवाजीनगर, नांदेड हा बरकत कॉम्पलेक्स येथे असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यावरुन सदर पथकांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेत असताना, तो पोलीसांना पाहुन पळ काढला. त्याचा पाठलाग करुन त्यास पकडुन ताब्यात घेऊन विचारपुस केली असता, तो शेख सोहेल शेख रज्जाक वय 20 वर्ष रा. तेहरानगर, शिवाजीनगर, नांदेड हा असल्याचे सांगीतला. सदर आरोपी विरुध्द माली गुन्हे दाखल असुन, तो वर नमुद गुन्हयातील फरार आरोपी असल्यामुळे त्यास या गुन्हयात अटक करुन तपास करण्यासाठी त्यास पोलीस ठाणे उमरी येथे वर्ग करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि शाहु, पोलीस अंमलदार मोतीराम पवार, तानाजी येळगे, शंकर केंद्रे, हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतूक केले आहे.