जिला

बोधन -लातूर, नांदेड – लातूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी द्या : खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

नांदेड :   मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने तातडीचे उपाययोजना कराव्यात मराठवाड्यातील अनेक भागात रेल्वेचे जाळे नव्याने विनायचे असल्याने नांदेड- लोहा — लातूर रोड आणि बोधन- मुखेड -लातूर रोड या नव्या मार्गाला तातडीने मंजूर द्यावी , नांदेड -बिदर रेल्वे मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी अशी मागणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे  केली आहे . मागण्याचे निवेदनही केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आले आहे.

मराठवाड्यातील विशेषतः नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुके आजही रेल्वे मार्गाने जोडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दळणवळणाच्या साधनांची कमतरता भासते आहे. ग्रामीण भागातील कृषी क्षेत्र जर रेल्वे मार्गाने जोडले गेले तर त्या भागातील उत्पादित मालाला इच्छित स्थळी पोचण्यासाठी मोठी मदत होईल . शिवाय नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील . या अनुषंगाने मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील नव्या रेल्वे मार्गांना मंजुरी द्यावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. यात नांदेड- लोहा- अहमदपूर -लातूर रोड , बोधन — लातूर रोड या नवीन रेल्वे मार्गांचा समावेश करण्यात यावा , बोधन -मुखेड _लातूर रोड रेल्वे मार्गामुळे मराठवाडा आणि तेलंगणा एकमेकाला जोडले जातील. ज्यामुळे शेकडो गाव रेल्वे मार्गावर आल्याने तेलंगणा आणि महाराष्ट्रातील नव्या दळणवळणाच्या आणि उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने बांधणी होईल .असा विश्वास खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला. नांदेड -लोहा -लातूर रोड ही मागणी  जुनीच आहे.

 

त्यामुळे या मागणीकडेही रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असून या नव्या मार्गासाठी तातडीने निधी मंजूर करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे . नांदेड- बिदर या रेल्वे मार्गाला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली मात्र प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही.  त्यामुळे हे काम सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने आपला ५० टक्के वाटा त्वरित मंजूर करून कामाला सुरुवात करावी अशी मागणीही खा.  चिखलीकर यांनी केली आहे .
 दरम्यान याच भेटीत खा. चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सिकंदराबाद -मनमाड अजिंठा ही एक्सप्रेस आता मुंबईपर्यंत वाढवावी , तिरुपती -निजामबाद रॉयल्स सीमा एक्सप्रेस नांदेड पर्यंत वाढवावी,  मुंबई — सिकंदराबाद रेल्वे ला तिरुपती पर्यंत जोडावे . नांदेड विभागातून कोकणासाठी एकही रेल्वे नाही त्यामुळे मराठवाड्याचा आणि कोकणाचा रेल्वे संपर्क वाढविण्याचे अनुषंगाने नांदेडहून  कोकणसाठी स्वतंत्र  रेल्वे सुरू करावी , जालना – मुंबई जनशताब्दी रेल्वेला नांदेड पर्यंत सोडावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button