मुदखेड येथे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध मुदखेड
रायगड जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी विरोधात बातमी दिल्याने त्याचा राग मनात धरून पंढरीनाथ आंबेरकर यांनी वारीशे यांच्या दुचाकीला आपल्या चार चाकी वाहनाने धडक देऊन त्यांची हत्या केली असून या या हत्येचा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेच्या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करून शशिकांत वारीशे यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व मराठी पत्रकार परिषदेच्या सूचनेनुसार पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी अशा आशयाचे निवेदन तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने नायब तहसीलदार शिवाजीराव जोगदंड यांना देण्यात आले .यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे माजी जिल्हा सहसचिव संजय कोलते, तालुका अध्यक्ष शेख जब्बार, अतीक अहेमद पत्रकार सिद्धार्थ चौदं ते धम्मदाता कांबळे , संतोष दर्शन वाढ, साहेबराव हास रे साहेबराव गागलवाड,अ. रजाक, अ. हकीम यांच्यासह अन्य पत्रकारांची उपस्थिती होती.
बबन कांबळे यांना श्रद्धांजली
दरम्यान यावेळी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकारितेतील दीपस्तंभ आंबेडकरी चळवळीतील लढवया चेहरा पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीत अव्याहतपणे समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणारे वृतरत्न दैनिक सम्राट चे संपादक बबन कांबळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असल्यामुळे त्यांना देखील पत्रकार बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.