स्पोर्ट्स

सृष्टी जोगदंड ची आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड…

नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा नांदेडची सुवर्णकन्या मराठवाडा एक्सप्रेस नावाने ओळखली जाणारी कुमारी सृष्टी बालाजी पाटील जोगदंड ची दिनांक 14 ते 19 मार्च 2023 दरम्यान चायनीज ताईपेयी येथे आयोजित “एशिया कप ” वर्ल्ड रँकिंग टूर्नामेंटसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सदरील स्पर्धेसाठीभारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीने साई सोनीपत येथे 6 ते 8 फेब्रुवारी 2023दरम्यान निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते .त्यात उच्चतम कामगिरी करत एलिमिनेशन सह राउंड रॉबिनमध्ये वेस्ट बंगालच्या आदिती जयस्वाल हरियाणाच्या तनिषा वर्मा ,किरण व राजस्थानच्या खुशी कुमावत यांना हरवत भारतीय संघात स्थान प्राप्त करीत सृष्टी नांदेडच्या इतिहासातील पहीली आंतरराष्ट्रीय धनुर्वीधा खेळाडू ठरली आहे .लहानपणापासून प्रशिक्षिका तथा आई वृषाली पाटील जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विधेचे धडे घेणाऱ्या सृष्टीने सलग चार वर्ष शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचा विक्रम केला आहे . नांदेडच्या खेळाडूंनी ऑलम्पिक स्पर्धा खेळाव्यात या हेतूने पछाडलेल्या वृषाली पाटील यांनी आपल्या एकमेव मुलीला धनुर्विद्या खेळासाठी वाहिले असून त्यावर तंतोतंत खरे उतरत सृष्टी जोगदंडने आपली निवड सार्थ केली आहे.

 

 

तिच्या यशाबद्दल तिचे राष्ट्रीय धनुर्वीद्या संघटनेचे महासचिव प्रमोद चांदुरकर ऑलम्पिक प्रशिक्षक रविशंकर सर , भारतीय खेळ प्राधीकरण कलकता चे विभागीय संचालक विनित कुमार प्रशिक्षीका पिंकी राणी, ब्रिजेश कुमार,महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट प्रशांत देशपांडे सोनल बुंदिले स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे क्रीडा उपसंचालक विजय संतान जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावर ,प्राचार्य मनोहर सूर्यवंशी ,प्राचार्य एनसी अनुराधा ,शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे ,जनार्दन गोपीले डॉ .हंसराज वैद्य ,बाबू गंधपवाड माजी जिल्हा क्रीडा अधिकारी गंगा लाल यादव ,आनंद बोबडे , विक्रांत खेडकर ,राजेश जांभळे जयपाल रेड्डी ,शंकर जाधव नांदेड तालुका आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास भुसेवार जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष सुरेश पांढरे ,राजेंद्र सुगावकर ,शिवाजी पुजरवाड प्रेम जाधव ,सचिन सिंह तेहरा ,अशोक मोरे ,उद्धव जगताप मालोजी कांबळे ,शिवाजी केंद्रे ,बालाजी चेरले ,गजानन फुलारी ,बाबुराव खंदारे ,अनिल बंदेल ,शिवकांता देशमुख संतोष कंनकावार,

 

संजय चव्हाण , प्रलोभ कुलकर्णी अवतार सिंग रामगडीया डॉ . भीमसिंग मुनीम , नंदकिशोर घोगरे ,ऋषिकेश टाक , राष्ट्रपाल नरवाडे ,सुशील दीक्षित ,नारायण गिरगावकर राज्य धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष प्राचार्य हरिदास रणदिवे ,रंगराव साळुंखे ,प्रवीण गडदे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक चंद्रकांत इलग, स्वप्निल भोयर , प्रवीण सावंत ,अभिजीत दळवी ,अमर जाधव शिवछत्रपती पुरस्कार विजेते सदानंद जाधव , प्रफुल डांगे ,विजय अंभोरे ,प्रणव भांदुरे ,गणेश विश्वकर्मा ,प्रणित सुतार , निरंजन मोरे ,अनिल थडकर . डॉ . राहुल वाघमारे डॉ .रमेश नांदेडकर ,नेहरू युवा समन्वयक चंदा रावळकर आशीष चुते , अभिजीत मुन्ना कदम , कल्याणी सूर्यवंशी

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button