जिला

वाहतूक नियामांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकावर ई चलान प्रणाली द्वारे दंडात्मक कारवाई

मा. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, कार्यालय मुंबई / वन स्टेट बन ई-चलान/ प्रकल्प संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेला असून सदर प्रकलंतर्गत कसुरदार वाहनचालकांवर ई चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते परंतु कसुरदार वाहन चालक हे त्यांचे वाहनावरील दंडाचा भरणा वेळेवर करत नसल्याने अनपेड चलानची संख्या वाढत आहे. नांदेड जिल्यातील सर्व वाहन चालक/मालक यांना याद्वारे कळविण्यात येते की, वाहतूक नियामांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकावर ई चलान प्रणाली द्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येते त्या बाबत एस.एम.एस. द्वारे सदर चलानाची १५ दिवसात दंडाची रक्कम भरणे बाबत सुचना(मैसेज) देण्यात येवुनही ब-याच वाहन चालक/मालक भरना करीत नाहीत. तरी सर्व वाहन चालक मालक यांना विनंती आहे की, आपल्या वाहनावरील दंड तात्काळ प्रभावाने शहर वाहतूक शाखा वजीराबाद, इतवारा येथील ट्रैफिक पोलीस अधिकारी/ अमलदार यांचेकडे किंवा जिल्यातील प्रत्येक पोलीसस्टेनला वाहनावरील दंड भरून घ्याव्यात दंड न भरल्यास दि.११/०२/२०२२ रोजी शनिवारी सकाळी १०.०० वाजता लोक अदालत मध्ये मा. जिल्हा व सत्र न्यायालयात नांदेड येथे (जिल्हा परीषद हायस्कुल) येथे हजर राहुन प्रलंबीत दंडाची तडजोड रक्कम भरावी. तरी वाहन चालकांनी नमुद प्रमाणे आपल्या बानावरील दंड तात्काळ प्रभवाने भरण्यात यावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा वजीराबाद पोलीस प्रशासनाकडुन सर्व जनतेस करण्यात येत आहे.
१. रोख स्वरुपात पेंडीग ई चलान चा भरणा करण्याकरीता पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा, इतवारा व वजिराबाद व पोलीस ठाणे वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ, इतवारा, नांदेड ग्रामीण, व तसेच ग्रामीण हद्दतील सर्व पोलीस ठाणे (३० पोलीस ठाणे), वजिराबाद चौक, डॉ.लेन, एस.टी.ओव्हर ब्रिज, कुसूमताई चौक, आय.टी.आय, वर्कशॉप, राज कॉर्नर, शिवमंदीर, तरोडा नाका या ठिकाणी दंडाचा रक्क्म भरणा करण्यासाठी पोलीस अंमलदार यांच्याकडे ई चलान डिव्हाईस देण्यात आले आहे.
२. सदर रक्कम ही डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड तसेच नगदी स्वरुपात भरता येईल. ३. पेटीएम अॅप मध्ये ई चलान वर जाऊन दंडाचा रक्कम भरता येते. ४. चलान केल्याच्या नंतर समोरील व्यक्तीला गेलेल्या मॅसेज मधील लिंक वर टच करुन दंडाचा
रक्कम भरणा करता येतो.
५. महा ट्राफीक अॅप मोबाईल मध्ये इन्टॉल करुन दंडाचा रक्कम भरणा करता येतो. ६.Mahatraffic.echallan.gov.in या वेबसाईडवर दंडाचा रक्कम भरणा करता येतो.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button