हेल्थ

67 व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर बॉल बॅटमिंटन स्पर्धेला सुरुवात

 लातूरच्या असद स्पॉटर्स अकॅडमीच्या वतीने नांदेड मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलच्या इंदिरा गांधी मैदानावर ही स्पर्धा पार पडणार आहे. मंगळवारी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी एमआयएमचे प्रदेश सरचिटणीस सय्यद मोईन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शराद्यक्ष रउफ जमीनदार, महाराष्ट्र राज्य बॉल बॅटमिंटन असोशियेशनचे अध्यक्ष पी के पटेल, कार्याध्यक्ष डी एस गोसावी, महासचिव अतुल इंगळे, संघटनेचे निरीक्षक राजेंद्र भांडरकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. स्पर्धेत 36 जिल्ह्यातील जवळपास ३०० मुली आणि ३०० मुलानी सहभाग घेतला आहे. असद अकॅडमीचे अध्यक्ष तथा इतवारा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक असद शेख यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. 9 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button