जिला

जागरूक पालक, सुदृढ बालक ” अभियान भोकर येथे सुरुवात 

भोकर :- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ” जागरूक पालक, सुदृढ बालक ” अभियान आज दि.९ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळा किनवट रोड भोकर येथील शाळे मध्ये अभियान सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे  अध्यक्ष भोकर उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार  राजेश लांडगे, गटविकास अधिकारी अमित राठोड, वैद्यकीय अधिक्षक डॉ अनंत चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ  राहुल वाघमारे  प्रमुख पाहुणे उपस्थित होते.  
अभियानाचे प्रास्ताविक डॉ अनंत चव्हाण, डॉ  राहुल वाघमारे यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली⁰.
भोकर शहर व तालुक्यात या अभियान मध्ये ० ते १८ वर्षापर्यंतची बालके व  किशोरवयीन मुलामुलींचे सर्वागीण तपासणी करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात प्रा आ केंद्र भोसी,किनी,मोघाळी व  मातुळ अंतर्गत गावामध्ये शाळा, अंगणवाडी येथे वैद्यकीय अधिकारी,  समुदाय आरोग्य अधिकारी,  यांच्या कडून तपासणी करण्यात येणार आहे. 
यावेळी पत्रकार बांधव दै. लोकमत राजेश वाघमारे, दै गोदातीर समाचार सिद्धार्थ जाधव, कदम, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पी.येल. खोकले, सहशिक्षक अविनाश रेड्डी, रामदास पुणेबोईनवाड, संजय खांडरे, तालुका समन्वयक जगदीश थडवे, अंगणवाडी पर्यवेक्षक कंरमकोडा मॅडम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अविनाश गुंडाळे, डॉ अपर्णा जोशी, डॉ  ज्योती यन्नावार, आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, एम ऐ सय्यद, औषध निर्माण अधिकारी गिरी रावलोड, आरोग्य कर्मचारी पांडुरंग तमलवाड, आरोग्य सेविका स्वाती सुवर्णकार, गजानन तमलवाड, जाधव आदी कर्मचारी, शिक्षक व  शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button