क्राईम
खंडणी मागणारा आरोपीस दोन तासाच्या आत केले गजाआड…..
दिनांक 03.02.2023 रोजी फिर्यादी, नामे अरूण नारायण अंकुलवार, वय 51 वर्षे, व्यवसाय नौकरी उपविभागीय अधीकारी विष्णुपूरी पाठबंधारे : उपविभाग नांदेड यांनी पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड येथे हजर येवुन फिर्यादी दिली की, ते दिनांक 29.01.2023 रोजी त्यांचे घरी असतांना 18.30 वा. चे सुमारास त्यांचे मोबाईलवर मो क्रं 9423401522 या नंबरवर अनोळखी इसम यांनी मोबाईल क्रमांक 9284913759 या वरून फोन करून 51,000/- रूपयाची मागणी केली. व नाव विचारले तर 1,01,000/- रू द्यावे लागेल. तु मामा चौकातील कार्यक्रमास येणार आहेस का, तुझे टुकडे करून लातुरला पाठवितो मला 51,000 /- रू आणुन दे तुला विचारून टाकतो. पांडुरंग येरावार सावकारला मीच मारलो अशी फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी देवुन खंडणीची मागणी केली असल्या बदल तक्रार दिले वरून पोस्टे भाग्यनगर नांदेड येथे गुरन 50/2023 कलम 385, 387 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ 209 मंगनाळे हे करीत आहेत.
पोनि श्री सुधाकर आडे, पोलीस स्टेशन भाग्यनगर, यांनी गुन्हे शोध पथकाचे सुशांत किणगे, सपोनि पोहेकॉ / किशोर हुंडे, गर्दनमारे, पोकॉ/ कदम यांना आरोपीचा शोध घेणे सांगीतले असता सदर गुन्हे शोधपथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचा शोध घेवून दोन तासाच्या आत ताब्यात घेतले आहे. सदर गुन्हयाचे तपासाअंती सदरचा आरोपी मनोरूग्ण असल्याचे आढळले. त्याचे विरूध्द योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्यात आली.