क्राईम
एक गावठी पिस्टल, तिन जिवंत काडतुसासह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक
अवैद्य शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते.
दिनांक 03/02/2023 रोजी श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्थागूशा नांदेड यांना नांदेड शहरातील माळटेकडी जाणारे रोडवरील पुलाखाली, नांदेड येथे एक इसम स्वतःचे जवळ पिस्टल बाळगुन असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार याना आंबिका मंगल कार्यालयाचे पाठीमागे, नांदेड येथे रवाना केले. स्थागुशा चे अधिकारी व अमंलदार यांनी माळटेकडी जाणारे रोडवरील पुलाखाली, नांदेड येथे जावुन आरोपी नामे आरेफ अनवर शेख वय 19 वर्ष व्यवसाय बेकार रा. मेनकुदळेगल्ली, अहमदपुर ता. अहमदपुर जि. लातुर यांना पकडुन त्यांची झडती घेतली असता, त्याचे कमरेला लावलेले एक गावटी बनावटीचे पिस्टल व तिन जिवंत काडतुस किंमती 36,800/- रुपयाचे मिळुन आल्याने ते जप्त करुन नमुद आरोपीविरुध्द श्री पांडुरंग माने सहा. पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांनी फिर्याद दिली असुन पो स्टे विमानतळ येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि/ सचिन सोनवणे, पोहेकॉ / 2144, पो कॉ / तानाजी येळगे, पोकॉ/ देवा चव्हाण पो कॉ / मोतीराम पवार, पोकों / रणधीर राजवन्सी, पो कॉ / महेश बडगु, चापोकॉ / हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.