मराठवाडा

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक दर्गा हजरत सय्यद शाह तुराबुल हक रहे यांचा उर्स

व्यापाऱ्यांना व धार्मीक कार्यक्रमासाठी उर्सात रात्रीच्या वेळेत वाढ करण्याची मागणी
 परभणी 🙁 परभणी जिल्हा प्रतिनिधी) राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या दर्गा हजरत सय्यद शाह तुराबुल हक रहे. यांच्या उर्साला सुरुवात झाली असून या ठिकाणी महाराष्ट्रातसह पर राज्यातून व्यापारी व भावीक भक्त या ठिकाणी येत आहे. परंतू पोलीस प्रशासनाच्या वतीने रात्री 10.30 ची वेळ देत उर्स बंद करण्यात येत आहे. यामुळे व्यापाऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. तसेच भावीक भक्त बाहेर जिल्हयासह राज्यातून येत आहेत त्यांना असुविधा होत आहे. त्यामुळे रात्रीची वेळ वाढवून देण्याची मागणी अनेक सामाजिक संघटनेच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
     राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे. यांच्या उर्सात सर्व धर्म समभाव आहे. या ठिकाणी सर्वच जाती धर्माचे भावीक भक्त येतात. शासनाच्या वतीने उर्सासाठी 2 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात येते. हा उर्स 2 फेब्रु. ते 15 फेब्रु. या काळात साजरा करण्यात येतो.
      या उर्साच्या काळात मोठया प्रमाणात धार्मिक कार्यक्रम आयोजीत केले आहेत व सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात साजरी करतात व हे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालतात. यामध्ये जिल्हयातील व राज्यातुन आलेले नागरीक मोठया संख्येने सहभागी होतात तसेच या उर्सात आजुबाजूच्या जिल्हयातील तसेच या जिल्यातून मोठया प्रमाणात भावीक व व्यापारी येतात हे भावीक या ठिकाणी नुमाईष मधुन खरेदी करतात. या करीता देशातील वेगवेगळया राज्यातून या ठिकाणी येऊन व्यापारी आपले दुकाने लावतात हे दुकाने रात्री पर्यंत चालु राहतात येणारे भाविक या ठिकाणी असलेले शोलेन्ड झुले व मनोरंजनाच्या मध्ये सहभागी होऊन आनंद घेतात.
याच वर्षी या उसार्तील दुकाने झोके, शोलॅन्ड याचा कालावधी हा रात्री 10 वाजेच्या नंतर बंद करावे असा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याचे कळते त्यामुळे उर्साच्या काळात भाविकांना आनंद घेता येणार नाही. या ठिकाणी बाहेर राज्यातुन खास करुन व्यापारीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते तसेच धार्मीक भावनांना देखील ठेस पोहचू शकते या सर्व बाबींचा विचार करुन रात्री उशिरापर्यत उसार्ची ठिकाणी दुकाने, शोलॅन्ड, झोके व इतर कार्यक्रम सुरु राहवेत असे आपण आपल्या स्तरावरुन संबंधीतांना आदेश द्यावेत जेणेकरुन की, भाविकांना व व्यापाऱ्यांना सोईचे होईल त्यामुळे रात्रीची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली या निवेदनावर मोहम्मद गौस झैन अध्यक्ष, झैन फाउंडेशन, स. रफिक पेडगांवकर जिल्हाध्यक्ष एमडीओ संघटना, अली खान, अध्यक्ष, अली खान मित्र मंडळ, महेमुद खान अध्यक्ष, महेमुद खान मित्र मंडळ, डॉ. अफवान खान अब्दुल रहेमान खान चारिटेबल ट्रस्ट ॲड. आसेफ पटेल अध्यक्ष, हजरत टिपु सुलतान युवा मंच, आसेफ मास्टर, अध्यक्ष, मास्टर फाउंडेशन नितीन नितीन सावंत अध्यक्ष, मानव मुक्ती मिशन महाराष्ट्र आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button