सृजन आणि अनुभूतीतून लेखक बनत असतो – डाॅ.दामोदर खडसे
नांदेड दि.२४ पीपल्स महाविद्यालयात ‘संवाद लेखक से’ हा अगळा-वेगळा उपकृम हिंदी विभागाद्वारे गत काही वर्षापासून अविरत सुरू आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात डॉ.दामोदर खडसे यांनी ‘संवाद लेखक से’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एक संवेदनशील लेखक सृजन आणि अनुभूतीतूनच बनतो असे प्रतिपादन केले. पूढे त्यांनी लेखन प्रक्रिया कशी बनते याचे स्वरूप सांगत त्यांची चर्चित पाठ्यक्रमातील ‘साहब फिर कब आएंगे माॅं !’ या कथेचे कथा-कथन केले. तसेच विविध विषयांच्या गंभीर कविता ही ऐकविल्या. कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रा. दत्ता भगत, तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.दामोदर खडसे ,डॉ. चंद्रदेव कवडे व डॉ. वृषाली किन्हाळकर उपस्थित होते.
तसेच संशोधक,बी.ए.,एम.ए. चे विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय प्रो.डॉ.भगवान जाधव यांनी करून दिला. तर कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.आर.एम.जाधव यांनी केले.यावेळी डॉ.अमोल काळे, डॉ.भानेगावकर,डॉ.मथु सांवत,डॉ.थोरात,डॉ.शिवराम जाधव,डॉ.अनंत राऊत,प्रा. कल्पना जाधव,प्रा.माया फूलवरे,डॉ.मिर्झा,डॉ.बोरा उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदी विभागातील डॉ. भिमराव घोडगे,डॉ.सय्यद वाजिद,डॉ. विलास वानखेडे,डॉ.वर्षा मोरे, डॉ.प्रीती यादव यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचलन डॉ.मुकुंद कवडे यांनी केले. तर आभार डॉ.विलास वानखेडे यांनी मानले.