मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रस्ते सुरक्षा अभियान संपन्न
मुजामपेट दि.२२येथे कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास” अंतर्गत सात दिवसीय विशेष वार्षिक शिबिर आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये मुजामपीठ येथील रहिवाशांसाठी मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी आणि रक्तगट तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते.या मोफत आरोग्य शिबिरामध्ये सेवा देण्यासाठी महानगरपालिका नांदेडचे क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.महम्मद बदीयोद्दीन,तुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी राठोड, नेत्ररोग चिकित्सक डॉ.नामदेव चव्हाणडाॅ.शाहनवाज यांच्यासह श्री.राम सोळंके,रंगनाथ कांबळे,डाॅ.अमित रोडे,अनिल पवार,श्रीमती एल. एस.पाठक,श्रीमती सी.आर.पवार,हे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तपासणी शिबिरात सेवा देण्यासाठी उपस्थित होते या मोफत रोगनिदान तपासणी शिबिरामध्ये गावातील गरजू लोकांनी आरोग्य तपासणी नेत्र तपासणी व रक्तगट तपासणी करून घेतली. सात दिवसाच्या या विशेष वार्षिक शिबिरामध्ये अनेक प्रबोधनात्मक जनजागृती व स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
या अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील प्रादेशिक परिवहन निरीक्षक श्री.माणिक कोरे यांनी रस्ते सुरक्षा विषयी स्वयंसेवक आणि गावातील लोकांना मार्गदर्शन केले. वाहनांचा वापर करत असताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे दुचाकी चालकाने हेल्मेट परिधान करावे, वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा, वाहनासाठी आवश्यक असणारे परवाने काढून घ्यावेत, वाहनांचे इन्शुरन्स केलेले असावे यासारख्या अनेक महत्वपूर्ण सूचना करून त्यांनी जनजागृती केली शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भुक्तरे, प्रा.अक्षय हासेवाड,प्रा.सय्यद सलमान, प्रा.मोहम्मद दानिश,प्रा. मोहम्मद अतिफुद्दीन,आयेशा बेगम,मोहम्मदी बेगम यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.