देश विदेश
नांदेड- गोवा रेल्वे लातूर- मिरजमार्गे सुरु करण्याची मागणी
नांदेड / प्रतिनिधी-नांदेड- गोवा, ही रेल्वे लातूर- मिरज मार्गे लवकरात लवकर सुरु करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक गिरधारी निहालानी यांनी वर्षभरापूर्वी रेल्वे बोर्डाकडे केली होती, परंतु अद्यापही, या मार्गाने ही रेल्वे सुरु झाली नसल्याने, अनेक प्रवाशाचा हिरमोड होत आहे. सध्या नांदेडहून गोवा जाण्यासाठी मनमाड किंवा मिरजहून जावे लागते. यामुळे प्रवासात, प्रवाशांना चढ- उतार करण्याचा त्रास सहन करावा लागतो. महाराष्ट्रात कोकण आणि गोवा ही दोन्ही, ठिकाण विश्वप्रसिध्द आहेत. पर्यटक केंद्र म्हणून, या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरातून पर्यटक येत
असतात. मराठवाड्यातून जाणारे पर्यटकही मोठ्या प्रमाणात सद्या नांदेडहून, गोव्यासाठी, जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला गर्दी होत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने, नांदेड ते गोवा रेल्वे सुरु करणे गरजेचे आहे. नांदेड- गोवा रेल्वेचा मार्ग परभणी-लातूर-कुर्डुवाडी, पंढरपूर- मिरज बेलगाव लोंढा असा आहे, यामार्गे रेल्वे सुरु झाल्यास मराठवाड्यातील पर्यटकांना गोवा बरोबरच, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गणपतीपुळे आदि धार्मिक स्थळांचे दर्शन होईल. याच बरोबर, गोवा येथे संपूर्ण जगातून आलेल्या प्रवाशांना नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेता येते. नांदेड-गोवा रेल्वेसाठी खा. चिखलीकर यांना निवेदन दिले आहे.
While some diaform+ cena customers might experience improvements within a couple of weeks, it is recommended to offer the supplement a few months to completely assess its effects.