शहर
जल वाहिनी दुरुस्तीचे कामाच्या तारीख मध्ये बदल
नांदेड शहरातील काबरानगर जलशुध्दीकरण केंद्र ३५ MLD येथे नविन पंप बसविणे व मुख्य जल वाहिनीवर मोठ्या प्रमाणात होत असलेली पाण्याची गळती दुरुस्ती करण्यासाठी दिनांक १९.०१.२०२३ व दिनांक २०.०१.२०२३ या दोन दिवशी काम करण्याचे नियोजन करण्यात आले होते, परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर दुरुस्तीचे काम दिनांक २३.०१.२०२३ व दिनांक २४.०१.२०२३ या दोन दिवशी करावयाचे असल्याने पंप बंद होणार आहे. त्यामुळे काबरानगर जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणारा डॉ. आंबेडकरनगर जलकुंभ, रामनगर जलकुंभ, गोकुळनगर जलकुंभ, लेबर कॉलनी जलकुंभ, नानानानी पार्क जलकुंभ, नंदीग्राम जलकुंभ, यात्री निवास जलकुंभ, हैदरबाग जलकुंभ, बोंढार जलकुंभ, ट्रेंचींग ग्राऊंड जलकुंभ व शक्तीनगर जलकुंभ या सर्व जलकुभावरुन होणारा पाणी पुरवठा दोन दिवस उशीराने होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व पाण्याचा वापर काटकसरीने करुन नांदेड वाघाळा महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती.
(!! पाणी हेच जीवन आहे त्याचा योग्य वापर करुन पाण्याचा अपव्यय टाळावा !!)