पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात प्रतिष्ठा मिळवता येते-प्राचार्य डाॅ.गणेश जोशी
मुजामपेठ दि.17 पत्रकारिता व्यवसायाचा वापर करून देखील समाजात पद-प्रतिष्ठा मिळवता येते असे मत एमजीएम पत्रकारिता व माध्यम शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.गणेश जोशी यांनी व्यक्त केले ते कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित विशेष वार्षिक शिबिर उद्बोधन वर्गात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.पुष्पा क्षीरसागर या होत्या. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भुक्तरे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सात दिवसीय विशेष वार्षिक शिबिर मुजामपेठ जुना येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात विविध तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे.याअंतर्गत प्रसार माध्यमातिल संधी या विषयावर मार्गदर्शन करताना प्राचार्य जोशी यांनी वरील मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, आज पत्रकारितेचे स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे,पत्रकारितेत स्पर्धा देखील वाढली आहे त्याचबरोबर संधीची देखील मोठ्या प्रमाणात उपलब्धता झाली आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया यांचा वापर करून देखील पत्रकारितेची धार तेज करता येते व या जोरावर आपल्याला समाजात प्रतिष्ठा देखील मिळवता येते.
अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद ही पत्रकारितेतून मिळत असते एक पत्रकार सर्व प्रशासकीय व्यवस्था आपल्या लिखाणाच्या जोरावर कार्यान्वित करू शकतो एवढी ताकद पत्रकारितेमध्ये आहे.तर प्रा.राज गायकवाड यांनी देखील वृत्तनिवेदन एक कला या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले वृत्त निवेदन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, हावभाव कसे ठेवले पाहिजे शैली कशी असली पाहिजे यांचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह महत्व पटवून दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी वृत्त निवेदक म्हणून भविष्यात रोजगार म्हणून निवडावा असे आव्हान केले. वृत्त निवेदन करत असताना तंत्र आणि शैली याचा खुबीने वापर करता आला पाहिजे तरच वृत्त निवेदक प्रभावीपणे बातमी प्रेक्षकापर्यंत पोहोचवू शकतो कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा.क्षीरसागर यांनी केला सूत्रसंचालन प्रा.डाॅ. स्मिता कोंडेवार यांनी केले तर आभार प्रा.दनिश यांनी मानले यावेळी प्रा.अक्षय हसेवाड, प्रा.णझीर शेख, प्रा.अतिफुद्दीन,आयेशा बेगम,मोहम्मदी बेगम,अबुझार गफारी,म.दानिश,फरदीन खान यांच्यासह रासेयो स्वयंसेवक व स्वयंसेवीका उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.