विद्यार्थ्यांनी सूक्ष्म अध्ययनातून ज्ञानार्जन केले पाहिजे – प्राचार्य डॉ.मुजावर
मुजामपेठ दि.17. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करत असताना सूक्ष्मपणे अध्ययन केले पाहिजे, सूक्ष्मपणे केलेल्या अध्ययनातून मिळणारे ज्ञान हे जीवनाला दिशा देणारे असते.याद्वारेच व्यक्तीच्या जीवनाची जडणघडण होत असते असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुजावर यांनी व्यक्त केले. ते कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष वार्षिक शिबिर उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
नांदेड येथून जवळच असलेल्या मुजामपेठ जुना या ठिकाणी कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय विशेष वार्षिक शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्रा.डी.बी.जांभरुणकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डाॅ. भागवत पस्तापुरे, प्रा.मो. मजहर सर, डॉ.उस्मान गणी,मुख्याध्यापक बळीराम बुकटे, वट्टमवारसर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांना मान्यवराद्वारे अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भुकतरे यांनी केले.पुढे डॉ. मुजावर म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाशी विद्यार्थ्यांना एकरूप होता येते व यातून ग्रामीण जीवनशैली कशा पद्धतीची असते याचेही आकलन होते. त्याचबरोबर श्रमप्रतिष्ठा काय असते याची जाणीव सुद्धा शिबिराच्या माध्यमातून होते.
राष्ट्रीय सेवा योजना नांदेड जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.पस्तापुरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना कशा पद्धतीने सुरू झाली त्यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा.डी.बी. जांभरुणकर यांनी केला. सूत्रसंचालन प्रा.दानिश यांनी केले तर आभार प्रभारी प्राचार्य डॉ.उस्मान गणि यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.स्मिता कोंडेवार, प्रा.पुष्पा क्षीरसागर,प्रा.शेख नजीर,प्रा. सय्यद सलमान. प्रा.अक्षय हासेवाड,प्रा.निजाम इनामदार, प्रा.अतिफुद्दीन,राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी मोहम्मद दानिश,फरदीन खान,अबुझर गफारी,गौस खान पठाण, मोहम्मदी बेगम,आयेशा बेगम तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.उद्घाटन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.