क्राईम
जबरी चोरी करणारे दोन आरोपी अटक 2,93,500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही
माली गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु होते.
दिनांक 14/01/2023 रोजी सायंकाळी श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नावघाट ब्रिज नांदेड येथे जबरी चोरी करणारे दोन आरोपी आहेत अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिल्याने पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी श्री व्दारकादास चिखलीकर यांना स्टाफ रवाना करण्याबाबत आदेशीत केले. पो नि स्थागुशा यांनी स्थागुशाचे पोउपनि दत्तात्रय काळे व अमंलदार रवाना केले.
स्थागुशा चे पथकाने नावघाट ब्रिज, नांदेड येथे जावुन सापळा रचुन आरोपी नामे 1) शेख इम्रान पि. शेख आलीम वय 19 वर्षे व्यवसाय बेकार रा. नावघाट नांदेड 2) शेख शायद शेख यासीन वय 20 वर्षे व्यवसाय बेकार रा. गाडीपुरा नांदेड यांना पकडुन विचारपुस करता त्यांनी पोलीस ठाणे भाग्यनगर गुरनं. 484/2022 कलम 392, 34 भा द वि व पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 20/2023 कलम 392,34 भादवि चे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. नमुद आरोपीतांकडुन एकुण 07 अॅण्डरॉईड मोबाईल दोन पल्सर 220 मोटार सायकल व एक खंजर असा एकुण 2,93,500/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांना पो. स्टे. भाग्यनगर गु र नं. 484/2022 कलम 392,34 भादवि गुन्ह्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे. नमुद आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड, पोउपनि / दत्तात्रय काळे पोहेकॉ / सखाराम नवघरे, गंगाधर कदम, पोना / बालाजी तेलंग, दिपक पवार, विठल शेळके, पोकॉ/ विलास कदम, गणेश धुमाळ, मारोती मोरे, महेश बडगु, राजु सिटीकर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.