भाजपला धक्का, आणखी एका मित्राने सोडली साथ; ‘बारामती’साठी थोपटले दंड!
2024 च्या विधानसभा निवडणुकीत रासपला विचारात घेतल्याशिवाय सरकार बनणार नाही,’ असा आशावाद महादेव जानकर यांनी बोलून दाखवला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची पंढरपूरमध्ये बैठक झाली, या बैठकीसाठी महादेव जानकर उपस्थित होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील माढा, बारामती, परभणी आणि उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर यांच्यापैकी एका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी जानकर यांनी सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवींच्या नावानं असावं, पण हे करताना स्थानिक मंत्री खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधांना विचारात घेणं आवश्यक आहे, असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे. 2014 च्या निवडणुकांआधी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुती झाली होती. या महायुतीमध्ये भाजप-शिवसेनेसोबत रामदास आठवलेंची आरपीआय, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महादेव जानकरांच्या रासप या पक्षांचा समावेश होता. 2014 निवडणुकीनंतर महादेव जानकरांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदही मिळालं होतं.