रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त वाहनधारकानी मोफत रेडीयमचा लाभ घेण्याचे आवाहन – मो. आरेफखान पठान
नांदेड – अर्धापुर महामार्ग पोलीस चौकीच्या बाजुला इंडीयन धाब्यासमोर मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन संस्था (एनजीओ)च्या संयुक्त विद्यमाने सचीव मो. आरेफखान पठान यांच्या तर्फे रस्त्यावरील धावणारी वाहने जी रेडीयम लावलेली नाहीत अश्या वाहनधारकांना मोफत रेडीयम स्टीकर लाऊन देण्यात येणार आहे. याचा लाभ सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, सहाचाकी अश्या सर्वच वाहनांना रिप्लेक्टर लाऊन देण्यात येत आहे. याचा सर्व गरजुनी सकाळी 10 ते 2 च्या दरम्यान उपस्थितीत नोंदवुन या रस्ता सुरक्षा सप्ताहचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहेत.
या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी अभीजीत राऊत, प्रादेशीक परीवहन अधिकारी शैलेश कामत, अविनाश राऊत, संदीप निमसे, भोकरचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती शफाखत आमेना, महामार्ग पोलीस निरीक्षक अरुण केंद्रे, अर्धापुर पोलीस निरीक्षक जाधव ह्या मान्यवरांच्या उपस्थित रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन होऊन ह्यांच्या हस्ते सर्व वाहनाना रिप्लेक्टर (रेडीयम) मोफत लावुन देण्यात येणार आहेत. यानंतर प्रमुख अधिकार्यांचे वाहन धारकांना वाहन चालविणे संबंधी मार्गदर्शन करण्यात येईल याचा सर्व वाहनधारकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मौलाना आझाद अल्पसंख्याक किशन संस्था तथा दैनिक नांदेड चौफेरचे संपादक मो. आरेफखान पठान व दोस्ती ट्रॉन्सपोर्ट कंपनीचे शमशीर खान पठान यांनी केलेले आहे.