क्राईम

काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीवर गोळीबार, बाफना उड्डाणपुलावरील थरार

नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीवर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना शहरातील बाफना उड्डाणपुलावर 11 वाजेच्या सुमारास काल रात्री घडली. यात महिलेच्या हाताच्या दंडाला गोळी लागली असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. सविता गायकवाड असे या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नांदेड शहर चांगलेच हादरले आहे.

सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्या आपल्या दुचाकीवरुन शांतीनगरहून मगनपुरा येथे आपल्या घरी जात होत्या. त्यावेळी बाफना उड्डाणपुलावर एका दुचाकीवरुन आलेल्या रहीम खान, जफर व अन्य एक अशा तिघांनी अडविले यातील रहीम खानशी ओळख असल्याने सविता गायकवाड थांबल्या. त्यांच्याशी वाद घातल्यानंतर त्यांच्यावर रहीम खानने गोळीबार केला. यात सविता गायकवाड यांच्या डावा हाताच्या दंडाला गोळी लागली. गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले.
या घटनेनंतर सवितागायकवाड यांनी इतवाराचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना मोबाईलवरून ही माहिती दिली. तेव्हा पोलिसांनीच त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आपल्याच गाडीतून दाखल केले. रुग्णालयात पोलीस अधीक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, पोलीस उपअधीक्षक डॉ. सिध्देश्वर भोर यांनी भेट देऊन सविता गायकवाड यांची विचारपूस केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आतिक नावाच्या व सविता गायकवाड या दोघाम एक आयचर खरेदी विक्री संदर्भात भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आतिकला अटक झाली होती. मात्र, सविता गायकवाड यांना फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे नोटीस देवून सोडण्यात आले होते. या गुन्हयात परभणी येथील रहिम खान या व्यक्तीने साक्ष दिली होती. त्यानंतर सविता गायकवाड यांनी आपल्या ओळखीच्या फैसल सोबत 7 जानेवारी रोजी रहीम खानच्या परभणी येथील घरी जावून गोंधळ घातला. या प्रकरणी कलम 452, 323, 506 प्रमाणे सविता गायकवाड आणि फैसल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यानंतर दि. 9 जानेवारी काल रात्री हा रहीम खान, जफर व अन्य एका तिसऱ्याने हा प्रकार घडवून सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.
सविता गायकवाड यांनी दिलेल्या जबाबानुसार इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 12/23 भारतीय दंडसंहितेच्या कलम 307, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button