शिक्षण

NEET परीक्षेतील घोट्याळ्या विरोधात युवक काँग्रेसचे बालाजी गाडेंच्या नेतृत्वात नांदेडात विद्यार्थी एल्गार मोर्चा

 

(या मोर्चास पंधरा हजाराच्या वर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग)
NEET 2024 घोटाळ्याच्या विरोधात परीक्षा पुन्हा घ्यावी या प्रमुख मागणीसह युवक काँग्रेस, PTA संघटना व CCTF संघटना यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांच्या नेतृत्वात हा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मोर्चा संपन्न झाला.

NEET 2024 या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. विद्यार्थ्यांना 180 मार्कांपर्यंत जास्‍त प्रमाणात ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत. तसेच या वर्षी सर्वोच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी 75% विद्यार्थी हे अशा प्रकारे ग्रेस मार्क देऊन गुणांचा फुगवटा करुन देण्यात आलेले गुणवत्ताधारक आहेत. सर्वप्रथम बिहार येथील पाटणा शहरात तेथील परीक्षेशी संबंधित काही लोकांना पेपरफुटी संबंधी अटक करण्यात आली होती. परंतु आता NTA म्हणते आहे की पेपरफुटी झालेलीच नाही. तर मग या लोकांना कशाच्या आधारावर अटक केली याचा काहीही खुलासा NTA ने केलेला नाही. या घोटाळ्यामुळे देशभरातील विविध प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांची निराशा झालेली आहे. सर्वसामान्यांच्या पोरांनी मेहनत घेऊन वर्ष वर्ष अभ्यास करायचा, त्यांच्या शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब मायबापांनी कष्ट करुन, पोटाला चिमटा घेऊन कमावलेला पैसा पोरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रचंड प्रमाणात पाण्यासारखा खर्च करायचा. आणि ऐनवेळी पैसेवाल्या धनाढ्य लोकांच्या पोरांनी आयत्या बिळावर नागोबा म्हणत पैशांच्या ताकदीवर घोटाळे करुन, NTA सारख्या संस्था “मॅनेज” करुन गोरगरीबांच्या हक्कांव‍र डल्ला मारायचा यातून सर्वसामान्य विद्यार्थी आमच्या मेहनतीला काहीही अर्थ नाही असा समज करवून घेऊन ते निराशावादी बनून निष्क्रीय बनण्याची शक्यता कदापि नजरेआड करता येत नाही.

 

यासाठीच NEET ही वैद्यकीय प्रवेश परिक्षा देशपातळीवर पुन्हा एकदा नव्याने निष्पक्षपाती पद्धतीने घेण्यात यावी, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीत SIT चे गठन करुन सदरील घोटाळ्याची चौकशी करावी, सध्यस्थितीत ही परीक्षा NTA (NATIONAL TESTING AGENCY) द्वारे घेण्यात येते, परंतु 2018 पूर्वी ती CBSE (CENTRAL BOARD OF SECONDERY EDUCATION) द्वारे घेण्यात यायची. तेव्हा ती विश्वासार्ह पद्धतीने घेतली जायची. आता NTA अंतर्गत घोटाळा झाल्यामुळे विद्यार्थ्यांची NTA वरील विश्वासार्हता भंग झालेली आहे. म्हणून इथून पुढे परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी CBSE द्वारेच परीक्षा घेण्यात यावी, सदरील घोटाळ्याची CBI (CENTRAL BUREAU OF INVESTIGATION) मार्फत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यांना घेऊन विद्यार्थ्यांच्या एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा 14 जून 2024 रोजी शहरातील भाग्यनगर कमान येथून सुरु होऊन हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत यशवंत महाविद्यालया समोरुन शंकरराव चव्हाण स्मृतीगृहाला वळसा घालून महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला.

 

यावेळी विविध विद्यार्थी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांनी भाषणे केली. तसेच भारतीय युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांनी समारोपीय भाषण केले. आणि यानंतर शिष्टमंडळाने वरील मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना दिले. या मोर्चास PTA चे माजी प्रदेशाध्यक्ष आर बी जाधव सर, PTA चे जिल्हाध्यक्ष राज आटकोरे सर, CCTF चे जिल्हाध्यक्ष नागेश कल्याणकर सर, कॉन्ग्रेस पक्षाचे केदार पा. साळुंखे, विश्वास कदम, महेश देशमुख, निरंजन पावडे, संदीप गौड, दिगांबर पा. तिडके, केतन देशमुख, प्रशांत पाटील मुंगल, शिवम मगरे, भास्कर कळणे, ज्ञानेश्वर मगरे, शरद पवार, महेश पवार, साहिल शेख, तिरुपती मगरे, युवा सेनेचे संभाजी गाडे, बापूजी गाडे तसेच हजारो विद्यार्थी, पालक आणि विविध चळवळीतील प्रतिनिधी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button