जिला

लोकसभेच्या पराभवानंतर चिखलीकरांकडून विधानसभेची तयारी, बहिणीविरोधातच उभे ठाकणार

नांदेड : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्यात आभार दौरा सुरु केला आहे. याच आभार दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकीची चाचपणी सुरू केली आहे. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून चिखलीकर हे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे चिखलीकरांचे दाजी तथा शेकापचे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे ह्या देखील याच मतदार क्षेत्रातून निवडणूक लढणार असल्याचे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक बहीण विरुद्ध भावामध्ये होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.

नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजप नेते प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला. काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी ५९ हजार ४४५ मतांच्या फरकाने चिखलीकर यांचा पराभव केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी होऊनही भाजपला नांदेडची जिंकता आली नाही. मराठा आरक्षण आणि अल्पसंख्यांक फॅक्टरचा फटका भाजपला बसला आहे. या पराभवानंतर चिखलीकर हे आता विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. लोहा कंधार विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढावी, अशी साद तालुक्यातील भाजप कार्यकर्ते त्यांना घालत आहेत. लोहा कंधार हे चिखलीकरांचे होम पीच आहे. या मतदारसंघात त्यांची पकड चांगली आहे. याच संघातून ते आमदार देखील राहिले आहेत.

सद्या या मतदार संघातील शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे आमदार आहेत. विशेष म्हणजे श्यामसुंदर शिंदे हे भाजपाचे माजी खासदार चिखलीकरांचे दाजी आहेत आणि आशाताई या त्यांच्या भगिनी आहेत. घनिष्ठ नातेसंबंध असले तरी त्यांच्यात राजकीय आणि कौटुंबिक वैर आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आशाताई शिंदे यांनी चिखलीकरांच्या विरोधात प्रचार केला होता. आता लोहा कंधार मतदार संघातून आशाताई शिंदे ह्या देखील निवडणूक लढणार अशा चर्चा आहेत.

पक्षाचा निर्णय मला मान्य असेल : चिखलीकर

दरम्यान पक्ष जो आदेश देईल, तो मला मान्य राहील, अशी प्रतिक्रिया विधानसभा लढविण्याच्या चर्चांवर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. म्हणजेच त्यांनी चर्चांचा इन्कार न करता विधानसभेला सामोरे जाणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या संकेतच दिले आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button