पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड हद्दीमध्ये 7.62 MM OFD-78-M-80 असे लिहीलेले 436 राऊंन्ड (काडतुस) मिळुन आले.
दिनांक 01.06.2024 रोजी रात्री 20.00 वा. चे सुमारास पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड येथील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक विनोद देशमुख व सोबत पोहेकों / गजानन किडे, प्रदिप गर्दनमारे, राठोड, कळके ओप्रकाश कवडे, पोकों / हणमंता कदम, कदम असे हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे पावडेवाडी शिवारातील राहणारा आकाश रामराव पावडे वय 24 वर्षे हा पावडेवाडी शिवारातील नाल्यामधील झाडाझुडपामध्ये मध काढण्यासाठी गेला असता त्याला नाल्यामध्ये रांऊन्ड (काडतुस) दिसुन आले.
सदरची माहिती प्राप्त होताच तात्काळ पोलीस निरीक्षक, रामदास शेंडगे, पोस्टे भाग्यनगर व वरील गुन्हे शोधपथकातील अधिकारी व अंमलदार असे सदर ठिकाणी आकाश रामराव पावडे यांचेसह जावून पाहणी केली असता पावडेवाडी शिवारातील नाल्यामध्ये 436 राऊंन्ड (काडतुस) नाल्याच्या मातीमध्ये अर्धवट उघडे पडलेले गंजून जिर्ण झालेल्या अवस्थेत मिळुन आलेले आहेत. सदर राऊंन्ड (काडतुस) ताब्यात घेतले. सदर राऊंन्ड वर पाठमागील फायरकॅप वर 7.62 MM OFD-78-M-80 असे कोरीव लिहीलेले आहे त्याबाबत पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार शाखेतील अंमलदार यांचे मार्फतीने तपासणी केली असता सदरील राऊंन्ड हे 1978 मध्ये 46 वर्षापुर्वी बनवले असुन ते गंजून जिर्ण होवून निकामी झालेले आहेत असे प्रथम दर्शनी दिसुन येत आहे. सदरचे राऊंन्ड त्या ठिकाणी कसे आले याबाबत सखोल तपास करणे कामी एक विशेष पथक नेमण्यात आले आहे.
सदर घटनास्थळी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री आबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्रीमती किरितीका, सहा. पोलीस अधिक्षक नांदेड शहर, पोलीस निरीक्षक, रामदास शेंडगे, पोस्टे भाग्यनगर, दहशदवाद विरोधी पथक नांदेड, डॉग स्कॉड नांदेड, बि.डी.डी.एस. पथक नांदेड यांनी भेट देवून पाहणी केली आहे. सदर घटने बाबत अधिक चौकशी पोलीस निरीक्षक, रामदास शेंडगे, पोस्टे भाग्यनगर हे करीत आहेत.