क्राईम

देगलूर येथे IPL क्रिकेट मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्या पाच आरोपीसह मुद्देमाल जप्त

 

दिनांक 22.05.2024 रोजी श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड यांचे आदेशाने स्था.गु.शा. येथील पोउपनि आशिष बोराटे, सपोउपनि संजय केंद्रे, पोना/2432 विठ्ठल शेळके, पोकों/3084 गणेश धुमाळ आणि चालक पोकॉ/3081 कलीम यांचे पथक अवैद्य धंदयाची माहीती काढून केसेस करणे कामी देगलूर उप विभागात रवाना झाले

सदर पथकाने देगलूर परीसरात जावून IPL क्रिकेट मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणारे ईसमाची गोपनीय माहीती काढली असता सुरज पुजलवार यांचे रामपूर रोड येथील शेतात काही ईसम मोबाईल फोनवरुन राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचे मध्ये चालू असलेल्या IPL क्रिकेट मॅचवर सट्टा लावून जुगार खेळत व खेळवित आहेत अशी बातमी मिळाल्याने नमुद पोलीस पथकाने माहीती मिळालेल्या ठिकाणी दिनांक 22.05.2024 रोजी 22.40 वाजता अचानक छापा मारला असता तिथे असलेल्या ईसमापैकी एक ईसम पळून गेला. व तीन ईसमांना मोबाईल फोनसह ताब्यात घेण्यात आले. मिळून आलेल्या ईसमांचे नावे पत्ते विचारता त्यांनी 1. सुरज हणमंतराव पुजलवार वय 30 वर्षे रा. शिदबानगर देगलूर 2. अदिनाथ बालाजी अटपलवार वय 28 वर्षे रा. लाईनगल्ली देगलूर 3. किशोर हणमंत अप्पा मठपती वय 25 वर्षे रा. आलूर ता. देगलूर असे सांगीतले त्यांना पळून गेलेल्या ईसमाचे नाव पत्ता विचारता त्याचे नाव साईनाथ गंगाधर बोनलवार रा. भायेगाव रोड देगलूर असे असल्याचे सांगीतले.

 

सदर ईसमानी क्रिक्रेट सट्टा हा सय्यद फेरोज ऊर्फ एफ.एम. रा.मुखेड यास देत असल्याचे सांगीतले. मिळून आलेल्या ईसमाचे ताब्यातील मोबाईल फोनची पाहणी करता त्यात लाईव्ह मॅच पाहून ग्राहकांचे कॉल स्विकारुन ग्राहकांना भाव सांगून ते क्रिकेट लाईन गुरु अॅपवर राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेजर्स बेगलोर या IPL क्रिकेट मॅचवर ग्राहकाकडून क्रिकेट सट्टा जुगार खेळत व खेळवित असताना दिसून आले. सदर ईसमांचे ताब्यातून क्रिकेट सटयाचे अंक लिहीलेली डायरी कि.अं. 20 रु. विविध कंपन्यांचे एकुण 09 मोबाईल फोन किंमती अंदाजे 1,11000, रोख रक्कम 2000/- रु. असा एकुण 1,13,020/- रु.चा मुद्येमाल मिळून आला.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे संजय विश्वनाथ केंद्रे सपोउपनि स्था.गु.शा. नांदेड यांचे फिर्यादवरुन आरोपीत नामे 1. सुरज हणमंतराव पुजलवार वय 30 वर्षे रा. शिदबानगर देगलूर 2. अदिनाथ बालाजी अटपलवार वय 28 वर्षे रा.लाईनगल्ली देगलूर 3. किशोर हणमंत अप्पा मठपती वय 25 वर्षे रा.आलूर ता. देगलूर 4. साईनाथ गंगाधर बोनलवार

रा. भायेगाव रोड देगलूर 5. सय्यद फिरोज ऊर्फ एफ.एम.रा. मुखेड यांचेविरुध्द पो.स्टे. देगलूर गुन्हा रजि. नंबर 217/2024 कलम 12 (अ) म.जु.का.प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्हयाचा तपास पोउपनि फड पो.स्टे. देगलूर हे करीत आहेत. सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक

स्थागुशा, पोउपनि आशिष बोराटे, सपोउपनि संजय केंद्रे, पोना/2432 विठ्ठल शेळके, पोकॉ/3084 गणेश धुमाळ आणि चालक पोकॉ/3081 कलीम यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक सो. यांनी कौतूक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button