टाऊन मार्केट सोसायटीत अखंडित सेवा पुरवठा करण्याची मागणी
नांदेड दि. 22 टाऊन मार्केट सोसायटीत सध्या विजेचा लपंडाव चालू आहे त्यामुळे अनेक उद्योगांचे नुकसान होत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिक व व्यावसायिकांनी टाऊन मार्केट मारुती मंदिर ते दत्तनगर या भागामध्ये नियमित व अखंडित वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे या परिसरातील नागरिक व व्यावसायिक हे नियमितपणे विज बिल भरणा करत असल्यामुळे त्यांना अखंडित वीज पुरवठा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे या परिसरात सध्या दिवसातून तीन ते चार वेळा विद्युत प्रवाह खंडित होत आहे.
याविषयी महावितरणच्या कार्यालयामध्ये विचारांनी केली असता अरेरवी आणि उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत त्यामुळे या परिसरातील नागरिकांवर एक प्रकारे अन्याय होत आहे याची दखल घेऊन सदरील परिसरात अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा या आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड शहर सचिव महेश ठाकूर यांनी दिले आहे सदरील निवेदनावर अनिकेत सिंह परदेशी, गजानन गायकवाड, विकी सिंग, शाम पाटील जाधव, शिवा कल्याणकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत