नांदेड पोलीसांनी बनावट सुर्य छाप टोटाचे तंबखु व साहीत्य जप्त केले
मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मां. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने अवैध धंद्यावर कार्यवाही करण्या बाबत आदेशीत करण्यात केले होते. त्याअनुषंगाने उपविभाग इतवारा येथील गुन्हेशोध पथकास दिनांक 29/03/2024, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण हाददीत मिल्लतनगर एम.जी.आर गार्डन येथे बनावटी सुर्यछाप जर्दा साठवुन ठेवल्या बाबत गोपनिय माहीती मिळाली.
त्यावरुन मिल्लतनगर येथे जावुन रेड. केला असता तेथे बनावट व्ही.एच. पटेल आणि कंपनी चाळीसगाव जिल्हा जळगांव या कंपनीच्या टोटयावरील हबेहुब दिसनारे लोगो, त्यावरील चिन्हे, आकृत्या, नावे वापरुन आरोपीने स्वःता चे आर्थिक फायदयासाठी बनावट सुर्य छाप टोटा तंबाखू भरण्यासाठी पुंगळ्या, त्यासाठी लागणारे प्रिन्टेड कागद, बनावट सुर्य छाप टोट्याचा पुड्या पॅक करण्यासाठी लागणारे प्रिन्टेड कागद, सुर्य मुखाचे चिन्हे असणारे प्रिंन्टेड कागद बनावट सुर्य छाप टोटाचे पॅकींग केलेले टोटयाचे पूडे व त्यासाठी वापरण्याचा नकली तंबाखू, तसेच गुटखा, बिडी यांचे प्रिंन्टेट कागद व पॉलीथीन असा एकुन 19,75,200/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला.
यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हा नोंद क्रमांक 258/ 2024 कलम 328,468,471,34 भादवी गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड नेमणुक इतवारा पोलीस स्टेशन करीत आहेत.
सदर कार्यवाही मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा.श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनात श्री सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा नांदेड उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकॉ/ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर शाखेचे राजु सिटीकर यांनी केली असुन त्यांचे वरिष्ठांनी कौतुक