जिला

नांदेड शहरातील ऑटोत विसरलेली बॅग मधील डायमंड ज्वेलरी, दोन मोबाईल नांदेड पोलीसांनी परत मिळवून दिला.

 

नांदेड शहरातील पुजा राहुल भट्टट्टड रा. सातारा ह.मु. दिलीपसिंग कॉलनी वजिराबाद हयांनी दिनांक 24.03.2024 रोजी गोविंद बाग गार्डन ते वजिराबाद ऑटोने प्रवास केला दरम्यान त्यांची ऑटोत विसरुन राहीली बॅग त्यामध्ये एक डॉयमंड ब्रासलेट किमत 3,50,000/- दोन मोबाईल किमत 45,000/- रुपये व नगदी रोख रक्कम 5000/- रुपये असा एकूण 4,00,000/- लाखाचा रुपयाचे चिज वस्तु गेल्या हे लक्षात आल्यावर त्यांनी पो.स्टे. वजिराबाद व मा. पोलीस अधिक्षक साहेब नांदेड यांना समक्ष भेट घेवून वरील हकीकत सांगीतली. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी लगेच सायबर पो.स्टे. चे पोउपनि श्री. गंगाप्रसाद दळवी यांना सदर प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यावरुन सायबर पो.स्टे.चे पोउपनि गंगाप्रसाद दळवी व खंडणी विरोधी पथकातील अंमलदार यांना माहिती देवून घटनास्थळी पाठविले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोविंद बाग गार्डन ते वजिराबाद येथील सिसिटीव्ही फुटेज तपासून तक्रारदार महिलेने सांगीतलेले ऑटोचालकाचे वर्णनावरुन चौकशी केली असता ऑटो नंबर MH26BD419 असल्याचे समजले. त्यावरुन ऑटोचालकाचे नाव व पत्ता काढून सदर ऑटो चालक रुपसिंग रामसिंग मल्ली रा.लंगरसाहिव रोड नांदेड याची असल्याचे समझले. ऑटोचालकाचा शोध घेवून त्यास विचारपूस केली असता ऑटोचालक हा देखील विसरलेली बॅग देण्यास तयार होता पण सदर बॅग ही कोणत्या प्रवाशाची आहे हे त्याला समजत नव्हते. व त्याने बॅग मधील सर्व मुद्येमाल जशास तसा ठेवला होता. आज रोजी मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे समक्ष तक्रारदार महिलेस बॅग व बॅग मधील मुद्येमाल जशास तसा परत मिळवून दिला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक श्री. अबिनाश कुमार नांदेड, पो.नि. जगदिश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे.चे पोउपनि गंगाप्रसाद दळवी व पोलीस अंमलदार राजेद्र सिटीकर, साहेबराव कदम, अनिल बिरादार यांनी पार पाडली.

सदर कामगीरी बाबत मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ऑटो चालक रुपसिंग रामसिंग मल्ली व सर्व पोलीस अधिकारी व अंमलदाराचे अभिनंदन केले आहे तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना त्यांचे वाहनामध्ये प्रवाशाची विसरलेली कोणतीही वस्तु, मालमत्ता ही जवळच्या पोलीस स्टेशन येथे जमा करावी असे आवाहन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button