चार तासांत चौकशी गुंडाळून विभागीय वन चौकशी समितीने केला पोबारा.!
किनवट( प्रतिनिधी) : किनवटचा राखीव जंगलातील सागवान झाडांचा अवैध वृक्ष तोडीने होरपळून निघालेल्या किनवट तालुक्यात पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्यप्रमाणात झाल्याने मागील तीन चार वर्षांपासून उन्हाळ्यात तापमान 45 अंशांचा पलीकडे जाऊन उन्हाचा तीव्र झळानी किनवटकर होळपरून निघत आहेत तर पावसाळ्यात पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई ने जनता तर जनता जंगलातील जंगली जनवारेही तीव्र पाणीटंचाईचा झळा सोसत आहेत.साधारणत दोन वर्षे आधी किनवट वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आणि बोधडी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मधे झालेल्या सागवान झाडांचा अवैध वृक्ष तोड प्रकरणी पुरावे सादर करूनही दीड ते दोन वर्षे चौकशी न करता चौकशीस टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी आणि अवैध वृक्ष तोडीस सहकार्य करणार्या वन अधिकारी व कर्मचारी यांचा वर तात्काळ कारवाई करण्याचा मागणीचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी मा.प्रधान मुख्य वनसंरक्षक साहेब (वनबल प्रमुख)नागपूर यांचे कडे मागील दीड वर्षात सहा चक्कर करत केला आहे.
एवढ्या चक्कर मारल्यानंतर भेट झाली तेव्हा त्यांनी तात्काळ दखल घेऊन चौकशीस टाळाटाळ करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडील चौकशी तात्काळ काढून घेतं ती नाशिक येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालय मधील विभागीय दक्षता अधिकारी यांचा कडे दिली होती.15 दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले असतानाही चौकशीस साधारणत दीड ते दोन महिने टाळलेच गेले होते आणि चुकून दोन महिन्यांनी चौकशीस मुहूर्त लागला तर चौकशीस तीन दिवस नेमून प्रत्यक्षात चार तासांत चौकशी गुंडाळून विभागीय चौकशी समितीने पोबारा केल्याचे आढळून आले आहे.
मराठवाड्यातील एकमेव सागवान झाडांचे राखीव जंगल असलेल्या किनवट तालुक्यात अवैध वृक्ष तोडीचे ग्रहण पाचवीलाच पुजलेले आहे.सामाजिक कार्यकर्ते पुरव्या निशी अवैध वृक्ष तोडी बाबत निवेदने करतात परंतु खालून ते वर पर्यंत एकच असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सिस्टीम मध्ये न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे गवताचा गंजीत सुई शोधणे असे आहे.सर्वच अधिकारी भ्रष्ट किंवा कामचुकार नसतात काही अपवादात्मक वनबल प्रमुख सारखे एखादे सोडले तर सर्वच सिस्टीम ही एकमेकांना वाचविनारीच आहे.
नागपुर कार्यालयात सहा सात चक्कर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) कार्यालयात दहा चक्कर आणि नांदेड वन विभाग कार्यालयात शंभर चक्कर मारल्यावर कुठे नाशिक येथील विभागीय अधिकारी यांचा कडे चौकशी देण्यात आली होती परंतु त्यांनीही भाताची परीक्षा शिता वरून करत जंगलातील चौकशी पूर्ण नियत क्षेत्रे न तपासता पन्नास मीटर परिघात निवेदन कर्त्यालाच जो दोन वर्षे आधी एकदाचं त्या परिसरात फिरला आहे त्याला परिपूर्ण पने जंगलाची माहिती नाही त्यालाच थुट दाखवण्याचे म्हणत त्यांनी दाखवलेल्या 50 थूटांतील 30 थुट ही तीन किंवा चार वर्षे आधीची आहेत तुमची तक्रार नुसार ही थुटे नाही चालत अताची म्हणजे या दोनच वर्षातील थुटे आम्ही बघणार असे म्हणत फक्तं 20 थुट नोंदवत चौकशी दोन तासांत गुंडाळली आहे.कार्यालयातील चौकशी 1 तास जंगलात जाण्याचा प्रवास अर्धा तास जंगलात दोन तास आणि परतीचा प्रवास अर्धा तास अशी मोजून चारच तासांत चौकशी गुंडाळून चौकशी समिती परतीचा प्रवासास लागली आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर काही वन कर्मचाऱ्यांनी सांगितले की सर्व खेळ मॅनेजमेंटचा आहे अंधारात बंद लिफाफ्यात सर्व चौकशी गुंडाळली आहे.
असेच जर होत राहिले तर तो काळ दूर नाही जेव्हा एखाद्या डॉक्युमेंट्री मधे किनवट मधे एके काळी असणारे जंगल बघण्याचे.!