शिक्षण
प्रेरणादायी : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खाऊ विक्रेत्याच्या मुली डॉ.आफरीन मुस्तफा खिच्ची ची गरुडझेप!
डॉक्टर होऊन कष्टकरी बापाचे स्वप्न केले पूर्ण…
किनवट (अकरम चव्हाण):
माहूर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ आदिवासी बंजारा बहुल गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई बाजार मध्ये डॉ.आफरीन मुस्तफा खिच्ची हीचा जन्म झाला.घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे वडिलांनी मुले गावामध्येच असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळेत दाखल केली.जेणेकरुन घरचे काम संभाळून शिक्षण घेता येईल.अशातच दहावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी त्यांच्या गावी राहून अंजनखेड येथे पूर्ण केले,“आपली गरिबी जर हाटवायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्यंय नाही. त्यामुळे तुम्ही शिक्षण घ्या.स्वत:च्या पायावर उभे रहा.”हाच संदेश घेवून मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेल्या ध्येयवेढ्या आफरीन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नांदेड येथून बी.ए.एम.एस पर्यंतचे शिक्षण ता.३० डिसेंबर २०२२ रोजी पुर्ण केले.वडिलांचे कष्ट आणि स्वप्न सत्यात उतरवायची खूणगाठ ही या तरुणीने तेव्हाच मारून ठेवली होती.. तशातच पुढचा प्रवासही सुरू झाला.
घर,समाज,आणि धर्माच्या रूढी-परंपरा!निरक्षरता आणि दारिद्रय या प्रसंगाना मात देत दुर्गम माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील एका अति- सामान्य कुटुंबाची लेक डॉ.आफरीनने आभाळ ठेंगणे करुण दाखविले.मुस्लिम समाजात मुलींना १० वी किंवा १२ वी नंतरचे शिक्षण घेणे म्हणजे खुप खरतड,सोशल मिडिया आणि मोबाइलच्या अतिवापरा मुळे घडणाऱ्या अघटित घटना आणि सभोवतालचे वातावरण बघता सर्वसामान्य मुस्लिम कुटुंब मुलींच्या उच्च शिक्षणा करीता सहसा धजावत नाही पण अलीकडे समाजाने कात टाकून आपली दिशा बदलण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे चित्र दिसत आहे.मुस्तफ़ा नजीर खिच्ची हे वाई बाजार येथे राहणारे आपल्या छोट्या गाडीवर लहान मुलांच्या खाऊचे दुकान खेड्या पाड्यात घेऊन आपला आणि आपल्या परिवाराचा गाडा चालवतात पण जिद्द अशी की आभाळ ही ठेंगणे!मेडिकलच्या तयारी साठी भरमसाठ पैसा खर्च करावा लागतो मोठ्या शहरात मुलीला ठेऊन त्याच्या कडून मेडिकलची तयारी करुण घेणे,तिच्या सुरक्षेची पण दक्षता घेणे,
इतर खर्च आपल्या छोट्याश्या खाऊच्या गाड्याच्या तटपुंज्या मिळकतीवर करणे म्हणजे खुप प्रेरणादायी बाब आहे.जिद्द आणि चिकाटी ही मुस्तफ़ा भाईच्या डीएनएचाच भाग असावा केवळ आफरींचेच शिक्षण नव्हे तर धाकटा मुलगा रेहान खिच्ची देखील गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगाव येथे बी.ए.एम.एस च्या प्रथम वर्षाला प्रवेशित आहे,तर लहान मुलगी महेक नांदेड येथील नारायण शंकरराव चव्हाण ला कॉलेज येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे.अशी मेहनती आणि करतबगार मुलं प्रत्येक बापाच्या नशिबी यावी हिच प्रार्थना!आपल्या वडिलांनी केलेल्या परिश्रमाची परतफेड करतांना या करबगार आफरीनला किती मेहनत घ्यावी लागली असेल,किती संकट आणि बाधांना तोंड द्यावे लागले असेल हे न सांगितलेले बरे!पण आफरीनने आपल्या जन्मदात्याने घेतलेली मेहनत आणि आपल्या मुलीवर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला! आफरीनचा हा प्रेरणादायी प्रवास केवळ मुस्लिम समाजातीलच नव्हे तर संपूर्ण गरीब होतकरू श्रमजीवी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे.
माहूर: बी.ए.एम.एस च्या पदवीदान समारंभात आई-वडील, आजी आणि छोट्या भावासोबत डॉ.आफरीन मुस्तफा खिच्ची.
२) डॉ.आफरीन मुस्तफा खिच्ची