क्राईम
जबरी चोरी प्रकरणातील तीन आरोपी चोरीचे मोबाईल सह अटक
मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, ईतवारा अति पदभार नांदेड शहर, यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या तसेच पोलीस ठाणे अंतर्गत सतत पेट्रोलींग ठेऊन गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या सुचना दिल्या.
सदर सुचनांप्रमाणे मा. अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे श्री. शिवराज जमदडे, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार पोहेकॉ/ दत्तराम जाधव, पोना/ शरदचंद्र चावरे, पोना/विजयकुमार नंदे, पोकॉ/ बालाजी कदम, पोकॉ रमेश सुर्यवंशी, पोकॉ/ भाऊसाहेब राठोड, पोकों / अरुण साखरे हे पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, फटाकामार्केट हिंगोली गेट नांदेड याठीकाणी तीन ईसम हे दारु सेवन करुन आहेत. त्यांनी रेल्वेस्टेशन व बसस्थानक परीसरामध्ये लोकांना धाक दाखवून त्यांचेकडील मोबाईल फोन जबरीने चोरुन घेतलेले आहेत. सदरचे मोबाईल फोन हे विक्री करण्याच्या बेतामध्ये असल्याची बातमी मिळाली. सदर बातमीच्या अनुषंगाने नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहीतीच्या ठीकाणी छापा मारला असता सदर ठीकाणी तीन ईसम मिळुन आले. त्यांना त्यांचे नाव गांव विचारणा करता त्यांनी आपले नांवे 01. हरजिंदरसिंघ मेवासिंघ वय 35 वर्षे व्यवसाय बेकार रा. बनवालीपुर ता.जि. तरणतारण राज्य पंजाब, 02. सुरेश ऊर्फ काल्या गोविंद गायकवाड, वय 32 वर्षे व्यवसाय बेकार रा. गौतमनगर सांगवी ता.जि. नांदेड. 03. विशाल भिमराव कांबळे, वय 19 वर्षे व्यवसाय बेकार रा. कापसी बु. ता.लोहा जि. नांदेड असे सांगीतले.
नमुद ईसमांना त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून त्यांची अंगझडती घेतली असता तीघांचेही ताब्यामध्ये चोरीचे मोबाईल फोन आढळुन आले. त्यांना सदर मोबाईल फोनच्या मालकी हक्काबाबत विचारणा करता त्यांचेकडे कोणत्याही प्रकारचे बिल आढळुन आले नाही. त्यांना विश्वासात घेडुन विचारणा करता त्यांनी सदरचे मोबाईल फोन हे बसस्थानक ते रेल्वेस्थानक परीसरामध्ये चोरी केले असल्याचे सांगितले. त्यांचेकडुन व्हीवो, टेक्नो, पोको, ओपो, नारझो, एम.आय., ईन्फीक्स व रेडमी कंपनीची असे एकुण (12) मोबाईल फोन किंमती 97000/- रुपयाचे मिळुन आले आहेत. सदर मोबाईल फोनची खात्री करता एक मोबाईल फोनच्या अनुषंगाने पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड याठीकाणी गु.र.न. 35/2024 कलम 392,323,506,34 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचे तपासीक अधिकारी श्री. राम केंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आरोपीतांना अटक केले असुन त्यांना मा. न्यायालयात हजर केले. मा. न्यायालयाने आरोपीतांची दिनांक 27.01.2024 पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन उर्वरीत मोबाईल फोनचा शोध घेत आहोत.