देगलूर नाका परिसरातील मधील निकृष्ट कामाची चौकशी करणे
नांदेड दि.12 देगलूर नाका परिसरातील महानगरपालिका व महाराष्ट्र शासन द्वारे अनेक विकास कामे मंजूर करण्यात आलेली आहेत यापैकी सध्या होत असलेल्या अनेक कामाचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे याकडे महानगरपालिकेने लक्ष देऊन संबंधित गुत्तेदारांवर योग्य ती कार्यवाही करावी आणि कामाचा दर्जा अधिक कसा चांगला होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर अध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे.
निकृष्ट कामाचा दर्जा सुधारून,संबधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिका आयुक्त यांना देखील दिली आहेत. या वेळी शेख रऊफ जमीनदार (जिल्हा शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस,नांदेड), धनंजय सूर्यवंशी (जिल्हा ग्रामीण अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस,नांदेड), निखिल शिव नाईक (प्रदेश सचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस), मोहम्मद सरफराज अहमद, (जिल्हा शहर सचिव, नांदेड) ,नईम खान, ऍड. बाळू नरवाडे, अतिक बिल्डडर,पंकज कांबळे, अब्दुल सत्तार, हर्षराज सिंघ रंधावा, काम्रान खान, मोहम्मद निसार, अनिल सरोदे, तुकाराम सूर्यवंशी, सिद्धार्थ जोंधळे, गणेश उत्तम वडजे, विजय घोगरे, तुळजेश ठाकूर उपस्थित होते