जड वाहनामुळे देगलूर नाका परिसरात वारंवार ट्रॅफिक जाम
नांदेड दि.12. शहरातील देगलूर नाका परिसर हा नेहमी वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो या परिसरात मोठ्या प्रमाणात जड वाहतुकीचा शिरकाव बिन दिक्कतपणे होत असल्याने वारंवार ट्रॅफिक जाम होत आहे.देगलूर नाका परिसरातच नाहीतर संपूर्ण नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक बिन दिक्कतपणे वावरत असताना आपल्याला दिसून येते. याकडे वाहतूक पोलीस देखील अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. शहरात अनेक ठिकाणी मोठी वाहने बिन दिक्कत पणे धावत आहेत त्यामुळे वारंवार वाहतूक विस्कळीत होऊन ट्रॅफिक जामचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
त्याचबरोबर अनेक नंबर प्लेट नसलेली वाहने देखील सर्रासपणे शहरांमध्ये धावताना दिसत आहेत. याकडेही पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या बाबीकडे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी गांभीर्याने लक्ष देऊन शहरांमध्ये प्रवेश करणाऱ्या जड वाहनावर योग्य ती कायदेशीर कारवाही करण्याच्या सूचना वाहतूक शाखेला देऊन त्याची अंमलबजावणी करून घेणे आवश्यक आहे नाहीतर या जड वाहतुकीमुळे मोठे अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देगलूर नाका चौकामध्ये तर ट्रॅफिक जाम होणे ही नित्याचीच बाब झाली आहे वाहतूक पोलिसांबरोबर शेख बशीर लाला, शेख शमशशुद्दीन हे सामाजिक कार्यकर्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.