शहर

शहरात दोन दिवसाचा पाणी पुरवठा होणार नाही.

नांदेड शहरातील कोटीतीर्थ पंपगृहातुन काबरानगर व डंकीन जलशुध्दीकरण केंद्राकडे जाणाऱ्या 1100 मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. सदर गळती दुरुस्तीचे काम दि. 11.12.2023 व दि. 12.12.2023 या दोन दिवशी हाती घेण्यात येत असल्यामुळे सदर दोन दिवसाचा पाणी पुरवठा होणार नाही.

करीता काबरानगर जलशुध्दीकरण केंद्रावरुन व डंकीन जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सर्व उत्तर नांदेडचा भाग (तरोडा, अशोकनगर व शिवाजीनगर झोन) तसेच दक्षिण नांदेडचा भाग (शक्तीनगर, बोंढार, हैदरबाग व ट्रेंचीग ग्राऊंड जलकुंभ व गांधी पुतळा, रेल्वे स्टेशन व खडकपुरा जलकुंभ) या सर्व जलकुंभावरुन होणारा दिनांक 11.12.2023 व 12.12.2023 रोजीचा पाणी पुरवठा होणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी व पाण्याचा वापर काटकसरीने करुन नांदेड वाघाळा महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button