किशोर नरवाडे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
नांदेड,. (कालीदास अनंतोजी) सरपंच परिषद मुंबई यांचा मानाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली खु. केंद्र निळा ता.जि.नांदेड येथील सहशिक्षक किशोर चंद्रकांत नरवाडे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या विशेष कार्याबद्दल जाहिर झाला. सदरील पुरस्काराने दि.3 डिसेंबर रोजी यशदा,पुणे येथे खा. डॉ श्रीकांत शिंदे,पद्मश्री पोपटराव पवार, राज्याचे ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव सुनिल चव्हाण, आ. अभिमन्यू पवार, आ. कृष्णा गजभे, आ.सुनील शेळके,सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याबरोबरच विविध यशस्वी उपक्रम राबविलेल्या आदर्श शिक्षकास सदरील पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.यावर्षीच्या मानाच्या पुरस्काराचे मानकरी सहशिक्षक किशोर नरवाडे हे ठरले आहेत.त्यांनी सण 2005 पासून आजपर्यंत लोणाळ ता. मुखेड, काटकळंबा ता.कंधार व चिखली खुर्द ता.नांदेड या तीन शाळेवर वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रम राबविल्याने विद्यार्थी कला,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात निपुण झाले तसेच अध्ययन निष्पत्तीवर आधारीत विविध प्रयोग राबविले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कोकाटे, नांदेड जिल्हाध्यक्ष नारायणराव पाटील, हनुमान चंदेल सरपंच पिंपरी, रोहित हिंगोले सरपंच निळा, होनाजी जामगे सरपंच सायाळ, गजानन कदम सरपंच एकदरा, प्रदीप पाटील मुळे सरपंच चिखली खुर्द, प्रभाकर शेजुळे सरपंच चिखली बु.,जुनी पेंशन संघटना नांदेड, अखिल महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना नांदेड, आर्चरी स्कुल नांदेड, शिक्षण विचारमंच नांदेड, युवा मंच देवंग्रा, ज्ञानोबा नागरगोजे, ज्ञानेश्वर पाटील,भानुदास नरवाडे पुणे, दत्ता वाघमारे पुणे, टॅक्स असोशिएशन पुणेचे ज्ञानेश्वर नरवाडे, सिरमचे वैज्ञानिक डॉ. संतोष नरवाडे, निलेश नरवाडे,धोंडोपंत पांचाळ बाणेर,वैजनाथ सूर्यवंशी तळणी,विशेषतः चिखली खुर्द येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.