1 एप्रिलपासून महापालिकेत शहर वासियां नवी सुविधा मालमत्ता खरेदीनंतर करदात्याची नोंद होणार !
नांदेड : प्रतिनिधी / राज्यातील १४ महापालिकेमध्ये मालमत्ता खरेदीनंतर आपोआप करदात्याची नोंद करण्याचे सॉफ्टवेअर निर्माण करण्यात आले आहे. त्या सॉफ्टवेअरचा वापर आता नांदेडकरांसाठी १ एप्रिलपासून सुरू करण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती महापालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी ही माहिती दिली.
मालत्ता खरेदीबाबत नोंदणी झाल्यानंतर त्याचे ऑटो म्युटेशन होणे आवश्यक आहे. एखाद्या मालमत्तेची खरेदी-विक्री झाल्यानंतर मिळकत पत्रिका (पी.आर. कार्ड) आणि करदाता अभिलेख (टेक्स पे रेकॉर्ड) यावर त्याची नोंद होते. या दोन्ही ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडन आता स्वयंचलित
माहिती पाठविण्यासाठी सुविधा आहे. म्हणजे मिळकत पत्रिका अद्यावत करण्यासाठी सर्वर ते सर्वर माहिती पुढे पाठवता येऊ शकते. विभागाचा सर्वर आणि संबंधित महापालिकेचा सर्वर याचे एकत्रिकरण करण्याची सुविधा आहे. त्यामुळे मालमत्तेची खरेदी करणाऱ्यांना महापालिकेत जाऊन स्वतःचे नाव मिळकतीवर
लावण्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. ही सुविधा नांदेड महापालिकेत १ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मुंबई येथे जाऊन संपूर्ण माहिती घेण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
खरेदी विक्री दस्त झाल्यानंतर
महापालिकेकडील व दस्तातील माहिती शंभर टक्के जुळल्यानंतर नव्या खरेदीदाराचे नाव करदाता म्हणून लागणार आहे. या सुविधेमुळे नांदेड महापालिकेचा महसूलदेखील वाढण्याची शक्यता आहे. १ एप्रिलपासून आता करदात्यांना आपल्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन महापालिकेचा मालमत्ता कर भरण्याची सुविधादेखील करण्यात येणार आहे. भविष्यात ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सुट देण्याचा विचार महापालिका करीत आहे. तत्पूर्वी आचारसंहिता लागू नये म्हणजे झाले, असेही ते म्हणाले. या सुविधेमुळे मालमत्ता कर धारकांना दिलासा मिळणार आहे.