जिला

राज्यस्मारकाला विद्रुपिकरण केलेल्या अतिक्रमण धारकांना वक्फ बोर्डाची नोटीस 

* तात्पुरत्या मुतवल्ली कडून झाले शर्तभंग फौजदारी कार्यवाही अटळ
* जिल्हा वक्फ अधिकाऱ्याची भुमिका संशयात
* राज्यस्मारकाच्या बाजुचे अवैध अतिक्रमण धारकावर फौजदारी कार्यवाही नोटीस
* तापुरत्या मुतवल्ली ला अवैध अतिक्रमण भोवणार
* इनामी जागेत परवानगी नसताना दिली जागा भाड्याने, शासनाची तंबी
* अकरा महिण्याचा कार्यकाळ संपला, आजही तात्पुरते मुतवल्ली कशे,संशोधनाचा विषय आहे
* इनामी जागेतील अवैध भाडे वसुली ताबेदार करतात,मग कायदेशीर कार्यवाही भाडेकरुवर का,अशी चर्चा जनतेतून आहे.
* तात्पुरत्या मुतवल्ली वर फौजदारी कार्यवाही होण्याचे संकेत

(नांदेड/प्रतिनिधी) बिलोली येथील राज्य संरक्षित मस्जिद कला दर्गा परिसरातील झालेल्या अनाधिकृत अतिक्रमण प्रकरणात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने दि.६ डिसेंबर २०२३ रोजी तात्पुरते मुतवल्लीसह तब्बल ११६ अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस पाठवून वक्फ अधिनियम कलम ५२ च्या नियमानुसार अतिक्रमण केलेली जागा,मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई व कलम ५२-अ नुसार येथील तात्पुरते मुतवल्ली व अतिक्रमणधारकांवर फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये असे पाठवलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.वक्फ मंडळ या नोटीसीनंतर पुढे काय कारवाई करेल याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

बिलोली येथील मस्जिद ए कला मजार नवाब सरफराज खान शहीद मकबरा झुजागन, नगारखाना व कब्रस्तान ही वक्फ मालमत्ता असून स्मारक नं.४९/१/१११/आॕर्क्यालाॕजिकल/५१,दि.१२/१/१९५३ राज्य संरक्षित स्मारक म्हणून शासनाकडे नोंद आहे.हि ऐतिहासिक व संरक्षित वास्तु असल्यामुळे पुरातत्व विभागाच्या परवानगी शिवाय या परिसरात शंभर मीटर पर्यंत कुठलेच नविन बांधकाम किंवा असलेल्या वास्तुच्या बांधकामात बदल करता येत नाही.सर्वे ५७७,५८० ची सर्व जागा हि वक्फ मंडळाच्या मालकीची आहे.पुरातत्व विभागाची परवानगी घेतल्याशिवाय वक्फ मंडळसुद्धा या ऐतिहासिक वास्तुच्या परिसरात नविन निर्माण करू शकत नाही.असे असले तरी येथील तात्पुरते मुतवल्ली शौकत बेग,मिर्झा अजीज बेग यांनी बेकायदेशीररित्या मंगलकार्यालय व दुकाने बांधुन वक्फ अधिनियम १९९५ चे कलम ५१,५६ चे उल्लंघन केले आहे.

याशिवाय काही जागेत बांधकाम सुद्धा करण्यात आले आहे.तरी आजपर्यंत येथील अतिक्रमण जशास तसे आहे.पुरातत्व विभागाने जिल्हाधिकारी,जिल्हा वक्फ अधिकारी,महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे वारंवार या अतिक्रमणांबाबत पाठपुरावा करून अनेक पञ पाठवले.पण शेवटी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्यकार्यकारी अधिकारी मो.बा.ताशिलदार यांनी येथील तात्पुरते मुतवल्लीसह तब्बल ११६ अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून त्यांना फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली आहे.या नोटिसाला अंदाजे चौदा दिवस झाले आहे.येथील तात्पुरत्या मुतवल्लींनी वक्फ नियमांचा शर्तभंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून तसेच राज्यस्मारक परिसरात अवैधअतिक्रमण होत असताना माञ जिल्ह्याचे वक्फ अधिकारी हे बघ्याची भुमिका घेत होते असे दिसून येत आहे.

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button